शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Acts For Senior Citizens : सांभाळ करणाऱ्या अपत्याला पालक देऊ शकतात अधिक संपत्ती- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 10:42 IST

Acts For Senior Citizens (Parents): पाच दशकांपासून सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वृद्ध पालक त्यांचा सांभाळ करणाऱ्या अपत्याला संपत्तीत अधिक वाटा देऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. देखभाल करणाऱ्या अपत्याला त्याच्या भावंडांच्या तुलनेत जास्त संपत्ती दिली जाऊ शकते, असं न्यायालयानं एका प्रकरणात निकाल देताना म्हटलं. एखाद्या वृद्ध पालकानं अशा प्रकारे अपत्याला संपत्तीत अधिक वाटा दिल्यास त्याला वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे केली असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. १९७० च्या दशकातील एका प्रकरणात न्यायालयानं हा निर्णय दिला.भावंडांमध्ये चाललेल्या संपत्तीच्या वादात न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि इंदिरा बॅनर्जी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. 'कोणत्याही महत्त्वपूर्ण साक्षीशिवाय या निष्कर्षावर (पालकांच्या वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे करणे) पोहोचणं योग्य होणार नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. एखादं अपत्य आई वडिलांचा नीट सांभाळ करत नसेल, मात्र त्याच व्यक्तीचं भावंड पालकांची नीट काळजी घेत असेल, तर त्या भावंडाला पालक संपत्तीत जास्त वाटा देऊ शकतात,' असं न्यायालयानं निकालात म्हटलं. एखाद्या अपत्यानं केवळ संपत्तीत अधिक वाटा मिळवण्यासाठी आपल्या मातापित्याची काळजी घेतली, असं म्हटलं जाऊ शकत नाही, हेदेखील न्यायालयानं स्पष्ट केलं. संपत्तीच्या वाटणीवर गेल्या ५ दशकांपासून एक प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच भावांमधून वाद सुरू होता. वडिलांनी त्यांच्या संपत्तीतला मोठा वाटा एका मुलाला दिला होता. वडिलांच्या वयाचा गैरफायदा घेऊन संपत्तीतला अधिक वाटा घेतल्याचा आरोप इतर भावंडांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानंही भावंडांच्या विरोधात निकाल दिला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSenior Citizenज्येष्ठ नागरिक