शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Supreme Court : केंद्राने माहिती न दिल्यानेच आर्थिक आरक्षण अडचणीत, उत्पन्नाचे निकष न सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:58 IST

Supreme Court : ‘नीट’द्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाबाबतच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

नवी दिल्ली : आर्थिक दुर्बलांना आरक्षणासाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाचा निकष कशाच्या आधारे नक्की केला, याची माहिती तयार असूनही केंद्र सरकारने ती वेळेत सादर केली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने समाधानकारक उत्तर न दिल्यास आर्थिक दुर्बलांचे आरक्षण स्थगित करावे लागेल, असा इशारा केंद्र सरकारला दिला.

‘नीट’द्वारे वैद्यकीय अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाबाबतच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुर्बलांसंदर्भातील आरक्षणाच्या निकषांच्या आधाराच्या माहितीचे प्रतिज्ञापत्र आता २८ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. 

आर्थिक दुर्बलांसाठी दिलेल्या आरक्षणामुळे आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याच्या तक्रारीच्या न्यायालयासमोर आहेत. वैद्यकीय नीट परीक्षेतील आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणालाही आव्हान देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने न्यायालयाने सवाल केला की, आर्थिक आरक्षणाचे निकष तुम्ही पुन्हा तपासून पाहणार की नाही? निकष हवेत ठरू शकत नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाची प्रश्नांची सरबत्ती - आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न हे कशाच्या आधारे ठरविले?- शहर व ग्रामीण भागांतही तेच निकष का आहेत?- राज्यघटनेनुसार वार्षिक उत्पनाची रक्कम ठरवण्याचा अधिकार राज्यांचा आहे ना?

केंद्र सरकारचे मत- आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचे २०१९ चे धोरण योग्य आहे, ते कायम राहावे. - ओबीसी क्रिमी लेअरसाठी २०१७ साली आर्थिक दुर्बलांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये होती. - महागाई निर्देशांकानुसार ती ८ लाख केली. आर्थिक दुर्बलांसाठीही तीच ठेवली. - प्रत्येक राज्यांनी उत्पन्न मर्यादा वेगळी ठेवल्यास गोंधळ होईल. एका राज्यातून अन्य राज्यांत शिकायला जाणारे विद्यार्थी अडचणीत येतील- केंद्राकडे ही माहिती असूनही ती न्यायालयात सादर न झाल्याने न्या. धनंजय चंद्रचूड, न्या, विक्रम नाथ, न्या. बी. व्ही. नागरत्न यांनी नाराजी व्यक्त केली. 

राज्यांचा अधिकार, आदेश केंद्राचाखंडपीठ म्हणाले की, १०३ व्या घटनादुरुस्तीद्वारे आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचे निकष ठरविण्याचा राज्यांना अधिकार आहे. मग केंद्र सरकार याबाबत आदेश कसा काढते, असाही सवाल न्यायालयाने केला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय