शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान; केंद्राला ६ आठवड्यांत बाजू मांडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 06:23 IST

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र, न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारकडून सहा आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले आहे.संसदेने कायद्यात १८-अ हे कलम घालून दुरुस्ती केली असली, तरी त्याचा पुनर्विचार करावा, अशा चार याचिका आज न्यायालयात आल्या. त्यापैकी एक अहमदनगरच्या संजीव भोर यांची असून, त्यांची बाजू मांडताना अ‍ॅड. दिलीप तौर यांनी १८-अ तरतुदीमुळे आरोपींना लगेच अटक होईल व त्यांना जामीनही मिळणार नाही, असे सांगून ती रद्द करावी आणि २0 मार्च २0१८ रोजीचा आदेश पुन्हा लागू करावा, अशी विनंती केली.मात्र, कायद्यामध्ये बदल करण्यास वा तरतुदीस स्थगिती देण्यास नकार देतानाच, न्यायालयाने केंदाला बाजू मांडण्यास सांगितले. मूळ कायद्यातही अटक झालेल्या व्यक्तीस जामीन मिळत नव्हता. त्या तरतुदींना महाराष्ट्रातील एका सरकारी अधिकाऱ्याने आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना न्यायालयाने लगेचच अटक करण्याची गरज नाही, वरिष्ठ अधिकाºयाने अशा प्रकरणाची चौकशी करावी आणि पुढील निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेबद्दल अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे लगेच अटकेची तरतूद कायम ठेवण्यासाठी सरकारने संसदेत दुरुस्ती विधेयक मांडले, ते मान्यही झाले. आता त्यालाच पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती घटनाबाह्य असल्याचे लगेच जाहीर करावे, अशी याचिकाकर्त्यांची विनंती न्या. ए. के. सिकरी व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अमान्य केली.कायदा दुरुस्तीमुळे भाजपा अडचणीतकायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात अनेक सवर्ण संघटनांनी गुरुवारी भारत बंदचे आवाहन केले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व छत्तीसगड या राज्यांत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.मात्र, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत या वर्षीच विधानसभा निवडणुका होणार असून, सवर्णांची ही नाराजी भाजपाला परवडणारी नाही. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती कायद्याची अंमलबजावणी राज्यांनी विचारपूर्वक व संथ गतीने करावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे.सवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना २५% आरक्षण द्यासवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यामुळे दलितांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय