शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 12:27 IST

सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे. आता राम मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले असता, त्यांनी सुनावणी जानेवारी 2019मध्ये होणार असल्याचं म्हटलं आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने सन 2010मध्ये या वादग्रस्त जागेची राम लल्ला, सुन्नी वक्फ मंडळ आणि निर्मोही आखाडा या तीन पक्षकारांमध्ये वाटणी करण्याचा निकाल दिला होता. अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या 2.77 एकर वादग्रस्त जागेवरून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये गेल्या एक शतकाहून अधिक काळापासून सुरू असलेल्या वादाच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. मध्यंतरी या अपिलांच्या सुनावणीत उपस्थित झालेला मुद्दा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावा का, असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘मशिदीमध्येच नमाज पढणे हा इस्लामच्या धर्माचरणाचा अविभाज्य भाग नाही,’ असे मत न्यायालयाने सन 1994मधील इस्माईल फारुकी प्रकरणात नोंदविले होते. अयोध्या अपिलांच्या सुनावणीपूर्वी त्याचा घटनापीठाने फेरविचार करावा का, असा तो मुद्दा होता; परंतु 27 सप्टेंबर रोजी 2:1 अशा बहुमताने हा मुद्दा घटनापीठाकडे न पाठविण्याचे ठरले. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार आहे. त्यामुळे कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच याचा निकालही लागू शकतो.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर