शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

माती वाचवा मोहिमेस 50 दिवसांत 2 अब्ज लोकांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 08:25 IST

बर्फ, वादळ, पाऊस आणि थंडी अशा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत सद्गुरूंनी प्रवास करीत आहेत

नवी दिल्ली : ५२ टक्के जमीन आधीच निकृष्ट झाल्यामुळे माती नामशेष होण्याच्या संकटावर लक्ष देण्याची तातडीची गरज आहे. त्यासाठी सद्गुरूंनी माती वाचवण्यासाठी १०० दिवसांचा ३०,००० किलोमीटर अंतराचा प्रवास सुरू केला असून, तो आता अर्ध्यापर्यंत पूर्ण झाला आहे. ५० दिवसांत सद्गुरूंनी माती वाचवण्याच्या नितांत गरजेकडे लक्ष वेधण्यासाठी युरोपातील अनेक राष्ट्र, मध्य आशियातील काही भाग आणि अरब राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत.

बर्फ, वादळ, पाऊस आणि थंडी अशा अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करीत सद्गुरूंनी प्रवास करीत आहेत. त्यांनी या प्रवासादरम्यान राजकीय नेते, मातीतज्ज्ञ, स्थानिक नागरिक, प्रसारमाध्यमे आणि मान्यवर व्यक्तीची भेट घेतली. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, माती वाचवा चळवळ आतापर्यंत २ अब्ज लोकांपर्यंत पोहोचली आहे. 

मे महिन्याच्या शेवटी भारतात पोहोचणारnसद्गुरूंनी बर्मिंगहॅम, लंडन, हेग, ॲमस्टरडॅम, बर्लिन, प्राग, व्हिएन्ना, ल्युब्लियाना, रोम, जिनिव्हा, पॅरिस, ब्रसेल्स, कोलोन, फ्रँकफर्ट, ब्राटीस्लाव्हा, बुडापेस्ट, बेलग्रेड, सोफिया, बुखारेस्ट, इस्तंबूल, टीबिलिसी, बाकू, अम्मान, तेल अवीव, रियाध आणि मनामा येथे भेटी दिल्या आहेत. ते सध्या दुबईमध्ये आहेत. nसद्गुरूंनी मे महिन्याच्या शेवटी भारतात पोहोचणार आहेत आणि २१ जूनपर्यंत देशभर प्रवास करतील. या महिन्याच्या अखेरीस सद्गुरू गुजरातमधील जामनगर येथे पोहोचतील आणि २५ दिवसांत ९ राज्यांतून प्रवास करतील. माती वाचवा प्रवास कावेरी खोऱ्यात संपेल, जिथे सद्गुरूंनी सुरू केलेल्या कावेरी कॉलिंग प्रकल्पाने १,२५,००० शेतकऱ्यांना माती आणि कावेरी नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी ६२ दशलक्ष झाडे लावण्यास सक्षम केले.

चळवळीचे फलितपर्यावरणीय कार्याचे नेतृत्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था जसे की, इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ नेशन्स (आययूसीएन) आणि संयुक्त राष्ट्रे संस्था या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पुढे आल्या आहेत.पहिल्या ५० दिवसांत, ७ कॅरिबियन राष्ट्रे, अझरबैजान, रोमानिया, अरब राष्ट्र यासह अनेक राष्ट्रांनी माती वाचवासह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

५४ राष्ट्रकुल राष्ट्र, युरोपियन युनियन आणि अनेक पॅन-युरोपियन संस्थासुद्धा पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाकिया, बल्गेरिया, इटली, व्हॅटिकन आणि सुरिनाम प्रजासत्ताक यांनी चळवळीला पाठिंबा दर्शविला आहे.जर्मनीच्या शिक्षण मंत्रालयाने जर्मनीच्या मुलांना माेहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आदेश जाहीर केला आहे.

मुस्लीम वर्ल्ड लीग यांनी जागतिक चळवळीला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.जगभरातून हजारो प्रभावी व्यक्ती, कलाकार, खेळाडू, पत्रकार आणि वैज्ञानिक जागरूकता करण्यासाठी पुढे आले आहेत.या चळवळीला १८ देशांतील २५० हून अधिक प्रसारमाध्यमांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

भारतातील ५ लक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मंत्र्यांना पत्र लिहून मातीच्या पुनरुज्जीवनासाठी कृती करण्याची विनंती केली आहे.काँग्रेस, भाजपा, आप, टीआरएस, बीजेडी, सपा, शिवसेना आणि इतर अनेक पक्षांसह भारतातील विविध पक्षांमधील नेत्यांनी या चळवळीला मनापासून पाठिंबा दर्शविला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी