शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'तिहेरी तलाक'पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी, चित्र नक्की बदलेलः सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:03 IST

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेतला आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत सुरू असलेल्या तिहेरी तलाकच्या विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकबरोबरच संसदेतील महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला आहे. 'तिहेरी तलाक'पेक्षा केंद्राने महिला आरक्षणाला मंजुरी द्यावी, चित्र नक्की बदलेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. महिलांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका, तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध नाही, पण पद्धतीला विरोध आहे. महिला आरक्षणालाही केंद्रानं मंजुरी द्यावी. सामाजिक बदल हा झालाच पाहिजे. काय चुकीचं आणि काय बरोबर ही येणारी पिढी ठरवेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.  सामाजिक परिवर्तनाच्या कोणीही विरोधात नाही, आमचा फक्त तिहेरी तलाकवरून सुरू असलेल्या राजकारणाला विरोध आहे. महिलांना सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. हा मुद्दा तुमचा आणि माझा नव्हे, तर तो महिलांचा मुद्दा आहे. तिहेरी तलाकसारखा मुद्दा अध्यादेशाच्या माध्यमातून सोडवण्याऐवजी सर्वसमावेशक मार्ग स्वीकारला पाहिजे. या तिहेरी तलाकच्या विधेयकामुळे पुरुष आणि महिलांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण होईल का?, याचा सरकारनं विचार करण्याची गरज आहे. तुम्ही पतीच्या कुटुंबीयांना धमकावून जेलमध्ये पाठवला, त्यानं काय सिद्ध होणार आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणलं जातंय, असं तुम्ही म्हणता. परंतु कुठली व्यक्ती स्वतःच्या अधिकारापासून वंचित आहे, याचाही सरकारनं विचार करावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

आपण महिलांना मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करायला हवे. विवाहसंस्था कुटुंब आणि पिढ्या प्रभावित करत आहेत. मुस्लिम महिलांचा आवाज लोकसभेत उठविण्यात आला. तिहेरी तलाक हा दंडनीय गुन्हा बनविण्याच्या विरोधात कोण आहे? चुकीचा अर्थ लावणाऱ्यांमागे किंवा धर्माचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कोण आहे?, अशा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही महिला सैन्यदलासाठी मजबूत आणि शक्तीशाली आहेत, हे आम्ही वेळोवेळी सिद्धही केले आहे. मग आम्ही का महिलांच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या शिक्षणावर बोलत नाही आहोत? आपण विधेयकावर पुन्हा विचार करायला हवा, हा गंभीर मुद्दा आहे. निवडणुका येतात, जातात मात्र, समाज बदलायला वेळ लागतो.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे