शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचं काय तर कुणाचं काय; 'निपाह व्हायरस'पासून वाचण्यासाठी मौलवीने सुचवला अजब उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 15:50 IST

निपाह व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही

कोझीकोड: सध्या केरळमध्ये निपाह विषाणूनं थैमान घातलं आहे. यामध्ये 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यानं लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. यावर आता सुन्नी समुदायाचे नेते नजर फैजी कुदाथयी यांनी एक अजब उपाय सांगितला आहे. निपाह विषाणूला रोखण्यासाठी आध्यात्मिक उपचार घेण्याचा सल्ला कुदाथयी यांनी दिला आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील 36 वा अध्याय वाचावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. याशिवाय या भागातील रहिवाशींनी शेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करावा, असंही ते म्हणाले आहेत. असं केल्यास निपाह विषाणूचा संसर्ग होणार नाही, असा दावा त्यांनी केला. कुदाथयी यांचा संदेश सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. कुदाथयी सुन्नी युवजना संगम संघटनेचे राज्य सचिव आहेत. वरिष्ठ सुन्नी विद्नान वावद कुन्हाकोया मुसालीर यांनी निपाह विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी उपाय सांगितला असल्याचं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. निपाहचा फैलाव झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांनी धोका टाळण्यासाठी मनकूस मौलिदचा आधार घ्यावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. मनकूस मौलिद हा प्रार्थनचा एक प्रकार आहे. मल्ल्याळी लोक आजारापासून दूर राहण्यासाठी ही प्रार्थना करतात. 500 वर्षांपूर्वी शेख जैनुद्दीन मखदूम यांनी पहिल्यांदा ही प्रार्थना केली होती, असं मानलं जातं. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी आध्यात्मिक उपाय करावेत, असं आवाहन कुदाथयी यांनी केलं. त्यासाठी त्यांनी एक व्हॉईस मेसेज तयार करुन तो अनेकांना व्हॉट्सअॅप केला आहे. लोकांनी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत असताना त्याला अध्यात्मिक उपचारांची जोड द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूkeralकेरळ