शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sunanda Pushkar Death Case: Shashi Tharoor यांना धक्का, सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:37 IST

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात थरूर यांना २०२१ मध्ये क्लीन चीट मिळाली होती

Sunanda Pushkar Death Case, Shashi Tharoor: सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटविरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी थरूर यांना दोषमुक्त करण्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी दिलेल्या निकालात सुनंदा पुष्करच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली. पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे. हा थरूर यांना मोठा दणका मानला जात आहे.

पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने शशी थरूर यांना दिल्ली पोलिसांनी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात 'विलंब माफी' मागणाऱ्या अर्जावर नोटीस बजावली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी निश्चित केली आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये, एका ट्रायल कोर्टाने शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. शशी थरूर यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे दाखवणारे कोणतेही साहित्य आम्हाला सापडले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे थरूर हे दोषमुक्त झाले होते. पण आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याने शशी थरूर यांना हा धक्का मानला जात आहे. या संबंधी आधीच्या वेळी फिर्यादीने तयार केलेली सामग्री "अत्यंत अपुरी" असल्याचे न्यायालयाने मानले होते. न्यायालयाने म्हटले होते की, थरूर यांनी सुनंदा पुष्करला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे उपलब्ध पुराव्यांतून तरी प्रथमदर्शनी दिसत नाही.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरSunanda Pushkarसुनंदा पुष्करdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालय