शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

निमलष्करी दलाच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा हल्ला; आयईडी स्फोटात CRPF चे दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 17:55 IST

Sukma IED Blast: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

Sukma News:छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी निमलष्करी दलातील जवानांच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले असून, अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून 201 कोब्रा कॉर्प्सची तुकडी आरओपी ड्युटीदरम्यान कॅम्प टेकलगुडेम येथे जात होती. या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.

आज (23 जून) दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवानांची ट्रक येताच आयईडी स्फोट झाला. या घटनेत ट्रक चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले, तर इतर काही सैनिक जखमी आहेत. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. शहीद जवानांचे पार्थिव घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहे. सध्या जवान या परिसरात शोधमोहिम राबवत आहेत.

बनावट नोटा जप्त आजच पोलीस, CRPF आणि DRG च्या टीमने सुकमा जंगलात बनावट नोटा आणि प्रिंटर मशीन जप्त केले. छाप्यादरम्यान 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर मशीनही सापडले. याशिवाय शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गावकऱ्यांना फसवून नक्षलवादी बनावट नोटा बाजारात आणत होते. सुकमातील कोरागुडा भागात ही शोध मोहीम राबवण्यात आली. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडBlastस्फोट