शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

200 कोटींची फसवणूक; महाठग सुकेश चंद्रशेखरला जामीन, पण तुरुंगातून सुटका नाहीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 19:10 IST

Sukesh Chandrashekhar Bail: महाठग सुकेश चंद्रशेखर याच्यावर फसवणुकीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Sukesh Chandrashekhar Bail :  200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने सुकेशला "दोन पाने" निवडणूक चिन्ह लाचखोरी प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी 2017 मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, जामीन मिळूनही सुकेश तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे, त्याच्यावर इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी(दि.30) सुकेश चंद्रशेखरला AIADMK च्या "दोन पाने" निवडणूक चिन्हाशी संबंधित लाचखोरी प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सुकेशला 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पीएमएलए प्रकरणात आणि दिल्ली पोलिसांच्या मकोका प्रकरणात सुकेशला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळेच सुकेश तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही. 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न सुकेश चंद्रशेखर याने AIADMK नेते टीटीव्ही दिनकरन यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आणि व्हीके शशिकला यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी पक्षाचे 'दोन पाने' निवडणूक चिन्ह सुरक्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सुकेशच्या पत्नीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू दरम्यान, सुकेशची पत्नी लीना मारिया हिच्या जामीन अर्जावरही काल दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली, पण दिल्ली पोलिसांनी जामीनाला विरोध केला. पोलिसांनी म्हटले की, सुकेशची पत्नी लीनाचे कुटुंबीय दुबईत राहतात, त्यामुळे ती दुबईला पळून जाऊ शकते. तिला जामीन मिळू नये. आता या प्रकरणाची सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपी लीनाचा गुन्हेगारी टोळीत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सुकेश चंद्रशेखर हा या टोळीचा सूत्रधार आणि म्होरक्या आहे. या पती-पत्नी दोघांनीही सरकारी अधिकारी असल्याचे दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीCourtन्यायालयdelhiदिल्ली