नाशिक : म्हसरूळ येथील चोवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १२) सकाळच्या सुमारास घडली़ मयत युवकाचे नाव आकाश फकिरा गांगुर्डे असे असून तो राजवाडा येथील रहिवासी आहे़ म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले असून तो एकटाच राहत होता़ यानंतर नैराश्यातून त्यास दारूचे व्यसन लागले होते़ त्यातूनच शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ ही बाब शेजार्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ (प्रतिनिधी)
म्हसरूळच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या
By admin | Updated: February 12, 2016 23:01 IST