शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 13:15 IST

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला आहे.

ठळक मुद्दे मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिलीपुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला

श्रीनगर -  सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला असून, मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता.त्याने केलेल्या या कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणला की, ''कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल. आदिल याने लहानपणीच आपले शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत असे. गेल्यावर्ष मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून, बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडलांनी पोलिसांत माहिती दिली होती. तसेच दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र तो माघारी फिरला नाही.'' आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते. 2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला, असेही आदिलच्या या नातेवाईकाने सांगितले. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत