शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:46 IST

रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावतीमुळे झाल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे.

Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murty) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मुघल सम्राट हुमायून आणि चित्तोडच्या राणी कर्णावती यांची गोष्ट सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नेटीझन्स सुधा मूर्तींना या व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.

पोस्टमध्ये नेमके काय आहे?सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सुरू करण्यामागे मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावती असल्याचे म्हटले. सुधा मूर्ती त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात, "16 व्या शतकात राणी कर्णावती संकटात होत्या, तेव्हा त्यांनी मदतीसाठी मुघल सम्राट हुमायूंकडे एक धागा पाठवला होता. येथूनच राखी पाठवण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे." या पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

सुधा मूर्तींनी सांगितली ती गोष्ट...सुधा मूर्तींनी या पोस्टमध्ये एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्या म्हणतात की, "रक्षाबंधन हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. एक बहीण तिच्या भावाला रक्षासूत्र बांधते. आपल्या अडचणीच्या काळात भाऊ मदतीसाठी यावा, यासाठी हा धागा बांधला जातो. आपण इतिहासात डोकावून बघितले, तर जेव्हा राणी कर्णावतीच्या राज्यावर दुसऱ्याने आक्रमण केले होते, तेव्हा तिने मुघल सम्राट हुमायूनला धागा पाठवून रक्षण करण्याची विनंती केली होती."

"हुमायून दुसऱ्या देशातून आलेला असल्याने त्याला या धाग्याचा आणि संदेशाचा अर्थ समजला नाही. मग त्याने आपल्या लोकांना याबद्दल विचारले. त्याच्या लोकांनी हुमायूनला सांगितले की, हा बहिणीचा भावाला आलेला संदेश आहे.  जेव्हा हुमायूला याचा अर्थ कळला, तेव्हा त्याने कर्णावतीच्या रक्षणासाठी ताबडतोब दिल्ली सोडली. पण त्याला तिथे पोहोचायला थोडा वेळ लागला, तोपर्यंत राणी कर्णावती मरण पावली होती. पण या कथेतून आपल्याला शिकायला मिळालेला धडा म्हणजे, बहीण अडचणीत असेल, तर ती आपल्या भावाला धागा पाठवून मदतीसाठी बोलावू शकते," अशी माहिती सुधा मूर्तांनी या व्हिडिओतून दिली. 

नेटकऱ्यांनी धरले धारेवर...सुधा मूर्तींच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकरी म्हणाले की, रक्षाबंधनाची सुरुवात महाभारत काळापासून झाली आहे. कृष्ण आणि द्रौपदी चांगले मित्र होते. युद्धात कृष्णाचे बोट कापले गेले, तेव्हा द्रौपदीने तिची साडी फाडून कृष्णाच्या बोटावर बांधली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा युद्धात जाण्यापूर्वी द्रौपदीने कृष्णाच्या मनगटावर राखी बांधली होती. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनSudha Murtyसुधा मूर्तीSocial Viralसोशल व्हायरल