शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन ऑइलच्या कार्यक्रमात अचानक लागला अश्लील व्हिडिओ, केंद्रीय मंत्री होते उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 16:09 IST

या घटनेशी संबंधित लोकांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांनी दिले आहेत.

गुवाहाटी: शनिवारी तिनसुकिया येथील हॉटेल मिराना येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्र्यां समोरच अश्लील व्हिडिओ क्लिप लागल्याची घटना घडली. यावेळी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि आसामचे कामगार मंत्री संचय किसन यांना एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइलने तिनसुकियामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. येथे मिथेनॉल-मिश्रित M-15 पेट्रोलच्या पायलट रोलआउटच्या लॉन्चिंगदरम्यान ही घटना घडली. प्रत्यक्षात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्टेजच्या मागे स्क्रीन लावण्यात आली होती, इंडियन ऑइलचे अधिकारी स्टेजवर बोलत असताना त्या स्क्रीनवर कथित अश्लील व्हिडिओ प्ले होऊ लागला.

काही सेकंदात व्हिडिओ हटवलाव्हिडीओ स्क्रीनवर येताच उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ काही सेकंदांसाठी स्क्रीनवर दिसला, त्यानंतर तो लगेच काढून टाकण्यात आला. ही घटना काही लोकांनी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी तिनसुकिया पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिकार्‍यांच्या मते, हा कार्यक्रम ऑनलाइन लाइव्ह-स्ट्रीम केला जात होता आणि इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्याने झूम मीटिंग आयडी आणि पासवर्ड त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. तेथूनच कोणीतरी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

झूम मीटिंगमधून व्हिडिओ शेअर केल्याची शक्यतातिनसुकियाचे पोलिस अधीक्षक देवजीत देवरी यांनी मीडियाला सांगितले, "गुन्हेगाराने कदाचित ट्विटर अकाउंटवरुन मीटिंग आयडी आणि पासवर्ड घेतला आणि झूम मीटिंगमध्ये सहभागी होऊन अश्लील व्हिडिओ स्ट्रीम केला." या घटनेवर प्रतिक्रिया देताना रामेश्वर तेली म्हणाले की, "ती क्लिप मी पाहिली नाही, पण माझ्या पर्सनल असिस्टंटने मला याची माहिती दिली. या घटनेशी संबंधित लोकांची चौकशी करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी, असे निर्देश मी दिले आहेत. 

टॅग्स :Assamआसाम