राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजीच्या ट्रकची भीषण धडक होऊन अपघात झाला. यामुळे मोठी आग लागली,या आगीत ४० हून अधिक गाड्या सापडल्या. यात प्रवाशांनी भरलेली एक बस सापडली. या बसला आग लागली. या आगीत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या बसमधील एका प्रत्यक्षदर्शीने सर्व आपबिती सांगितली आहे.
मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...
जयपूरमधील मान सिंह रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३७ जण जखमी झाले. या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवासी सुनील यांनी सांगितले की, "आम्ही राजसमंदहून जयपूरला येत होतो. अचानक आमच्या बसजवळ स्फोट झाला. आमच्या आजूबाजूला आग लागली होती आणि बसमध्येही आग लागली होती.
सुनील म्हणाले की, आग लागल्याचे समजल्यानंतर आम्ही वाचण्यासठी बसचा मेन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा लॉक होता. यानंतर आम्ही खिडकी तोडून बाहेर आलो. आमच्यासोबत आणखी ८ ते १० लोक बाहेर आले. काही लोक आतच राहिले तर काही जणांचा मृत्यू झाला.
आगीच्या घटनेबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, "सुमारे ४० गाड्या आगीत अडकल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि आता फक्त १-२ वाहने उरली असून या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत.
राजस्थानमधून जाणाऱ्या जयपूर-अजमेर महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०-२२ गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र अडीच तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकली नाही. यावरून हा अपघात किती भीषण झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. दोन्ही ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, अनेक वाहनांना त्याचा फटका बसला. महामार्गाच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात ही आग दिसत होती.