शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशात अचानक होणारे मृत्यू 12 टक्क्यांनी वाढले; हार्ट अटॅकसोबतच 'ही' गोष्ट ठरतेय कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:08 IST

देशात अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनांनी लोक हैराण झाले आहेत. डॉक्टर आणि ICMR सारख्या संस्था देखील याचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही वर्षांत देशात अचानक झालेल्या मृत्यूच्या घटनांनी लोक हैराण झाले आहेत. डॉक्टर आणि ICMR सारख्या संस्था देखील याचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून समोर आले आहे की, 2022 मध्ये सुमारे 57 हजार लोकांचा अचानक मृत्यू झाला. यापैकी 57 टक्के प्रकरणे अशी होती ज्यात लोकांना हार्ट अटॅक आला होता. NCRB नुसार, अशा प्रकारे 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबी राज्य पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वार्षिक अहवाल तयार करते. आकस्मिक मृत्यूंमध्ये अशी प्रकरणे आहेत ज्यात पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आकस्मिक मृत्यूंना अनपेक्षित मृत्यू मानतात, ज्यामध्ये व्यक्तीचा मृत्यू हिंसेव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे झाला. जर आपण अचानक मृत्यूच्या कारणाबद्दल बोललो तर, हार्ट अटॅक शिवाय ब्रेन हॅमरेज हे देखील एक प्रमुख कारण आहे. गेल्या महिन्यात एका अभ्यासात असे सांगण्यात आले होते की, अचानक होणारा मृत्यू आणि कोरोना लस यांचा काही संबंध नाही.

कोरोनाची लस घेणारे लोक आकस्मिक मृत्यूचे बळी ठरत आहेत अशी चर्चा होती. त्यानंतर ICMR ने अशा प्रकरणांचा अभ्यास केला आणि अहवालात हे चुकीचे असल्याचे आढळले. आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच सल्ला दिला होता की ज्यांना कोरोना आहे त्यांनी काही वर्षे जास्त मेहनत आणि हाय इन्टेन्सिटी असलेला व्यायाम करू नये. NCRB म्हणते की, 2022 मध्ये एकूण 3.9 लाख मृत्यूंपैकी 13.4 टक्के मृत्यू अचानक झाले. यातील एक तृतीयांश लोक 45 ते 60 वयोगटातील होते.

गेल्या वर्षी अचानक होणाऱ्या मृत्यूची संख्या ही महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 14,927 होती. याशिवाय केरळमध्ये 6,607 आणि कर्नाटकात 5,848 लोकांच्या मृत्यू झाला. आजारामुळे किंवा घरी अचानक हार्ट अटॅक आल्याने लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनांची पोलिसांत नोंद होत नाही. त्यामुळे हा आकडाही कमी असू शकतो. गेल्या वर्षीही या राज्यांची क्रमवारी अशीच होती. आकडेवारी दर्शवते की 2022 मध्ये हार्ट अटॅकने 32,410 मृत्यू झाले.  

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग