शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Video: दिल्लीत ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना अशी मारहाण?, सुप्रिया सुळेंकडून तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 17:04 IST

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

नवी दिल्ली - देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पोलिसांकडून ऑलिंम्पिक विजेत्या खेळाडूंचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. 

नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून येते. त्यावरुन, खासदार सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

आमच्या ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर पदकविजेत्या महिला खेळाडूंशी होत असलेलं वर्तन निंदणीय आहे. ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला, अशा खेळाडूंना न्यायासाठी अशा लढाया कराव्या लागतात, हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्या विजेत्यांचा सर्वांनीच ऑलिंपिक विजयानंतर मोठा सत्कार केला होता, मग अचानकपणे न्याय मागणारे हे हिरो खलनायक आहेत का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध नोंदवलाय. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारहाण करण्यास  पोलिसांना परवानगी दिली होती का? केंद्र सरकारने निःसंदिग्ध उत्तरे द्यावीत, असेही त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, कुस्तीपटू संगिता फोगाटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय साक्षी मलिकला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करा, या मागणीसाठी २३ एप्रिलपासून पैलवान आखाड्याबाहेरील कुस्ती लढत आहेत. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्यावर एफआयर दाखल केला असला तरी आम्ही अटकेवर ठाम असल्याची भूमिका आंदोलक पैलवानांची आहे.  

टॅग्स :Wrestlingकुस्तीSupriya Suleसुप्रिया सुळेdelhiदिल्लीministerमंत्री