शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: यशस्वी प्रयोग! अँटिबॉडी कॉकटेलच्या वापरामुळे 24 तासांत कोरोना लक्षणे गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 06:54 IST

Monoclonal antibody treatment on Corona: हैदराबादच्या  ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’चा प्रयोग यशस्वी. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यावर याच थेरपीने उपचार घेतले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कहैदराबाद : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेचा जोर आता देशात ओसरत चालला आहे. देशभर लसीकरण मोहिमेनेही वेग घेतला आहे. तसेच नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी’ या संस्थेने ४० हून अधिक कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा (Monoclonal antibody treatment) केलेला प्रयोग यशस्वी ठरल्याचे आढळून आले आहे. (Monoclonal antibody treatment is now seen as a relatively effective and safer alternative in treating COVID-19 patients)

अँटिबॉडी कॉकटेलचा डोस घेताच पहिल्याच दिवशी बाधितांमधील लक्षणे गायब झाली. यामुळे रुग्णांना कोरोनातून बरे करण्यासाठी आणखी एक चांगला पर्याय  मिळू शकणार आहे. अशा प्रकारे कोरोनावर उपचार करता येऊ शकतो याची चाचपणी गेले अनेक दिवस देशात विविध ठिकाणी सुरू होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधाचा वापर करावा, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे असून याचा अतिवापर टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कासिरिव्हिमॅब, इंडेव्हिमॅबचा समावेश n मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस बाधितांना कोरोनाची लागण झाल्यावर तीन ते सात दिवसांच्या आत दिला जातो. या कॉकटेलमध्ये कासिरिव्हिमॅब आणि इंडेव्हिमॅब या दोन औषधांचा समावेश केलेला असतो. n भारतात या औषधाची किंमत ७० हजार रुपयांहून अधिक आहे. उल्लेखनीय म्हणजे किंमत अधिक असूनही या अँटिबॉडी कॉकटेलच्या मागणीत वाढ होताना दिसून येत आहे.  

मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा एक डोस घेतल्यानंतर २४ तासांत ४० हून अधिक कोरोनाबाधितांची ताप, अस्वस्थता, खोकला यांसारखी लक्षणे १०० टक्के गायब झाल्याचे पीसीआर चाचणीतून स्पष्ट झाले. हे औषध ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटविरोधात उत्तमरीत्या प्रभावी ठरले आहे. मात्र, भारतातील डेल्टा व्हेरिएंटवर ते प्रभावी आहे किंवा कसे, याचा अभ्यास अद्याप झालेला नाही. आम्ही जे केले तो एक प्रकारे प्रयोगच होता.     - डॉ. नागेश्वर रेड्डी, अध्यक्ष, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली हीच थेरपी कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या बाधितांमध्ये मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचा वापर केला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी कोरोनाची लागण झाल्यावर याच थेरपीने उपचार घेतले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या