मोंदींच्या रणनीतीला यश

By Admin | Published: July 10, 2014 02:29 AM2014-07-10T02:29:30+5:302014-07-10T02:29:30+5:30

मोदी सरकारमध्ये गृहमंत्री बनल्यानंतर राजनाथसिंह यांच्यावर एक व्यक्ती, एक पद या सिद्धांतानुसार पक्षाध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव वाढला होता़

Success in the strategy of the monkeys | मोंदींच्या रणनीतीला यश

मोंदींच्या रणनीतीला यश

googlenewsNext
नवी दिल्ली : मोदी सरकारमध्ये गृहमंत्री बनल्यानंतर राजनाथसिंह यांच्यावर एक व्यक्ती, एक पद या सिद्धांतानुसार पक्षाध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव वाढला होता़ त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पक्षाचे महासचिव ज़ेपी़ नड्डा, ओ़पी़ माथूर यांची नावेही चर्चेत होती़ मात्र मोदींनी अमित शहांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वानेही यावर शिक्कामोर्तब केल़े 
शेअर दलालीच्या पेशाशी जुळलेले अमित शहा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात़ मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारमध्ये गृहराज्यमंत्री राहिलेले शहा यांचे नाव सोहराबुद्दीन, तुलसी राम प्रजापती आणि इशरत जहां बनावट चकमकप्रकरणात समोर आल़े गुजरातेत एका महिलेच्या हेरगिरीच्या आरोपावरून ते वादग्रस्त ठरल़े मात्र याउपरही ताज्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे संघटन कौशल्य आणि राजकीय व्यवस्थापन या जोरावर भाजपाने उत्तर प्रदेशात नेत्रदीपक यश मिळवल़े 
 भाजपा सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांत भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलवून शहा यांच्या नियुक्तीवर मोहोर लावली जाईल़ त्यानंतरच ते आपली टीम निवडू शकतील़ संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिल्ली, अहमदाबाद किंवा मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाऊ शकत़े महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक मुंबई वा नागपुरात होण्याची शक्यता वर्तविली जात आह़े तिकडे हरियाणातही विधानसभा निवडणूक होऊ घातली आह़े त्यामुळे राष्ट्रीय परिषदेची बैठक रोहतक किंवा दिल्लीत व्हावी, यासाठी हरियाणातील भाजप नेते प्रयत्नशील आहेत़
 
अमित शहा यांच्या गळ्यात पक्षाध्यक्षपदाची 
माळ पडल्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय संघटनेतही मोठय़ा फेरबदलांची शक्यता व्यक्त केली जात आह़े राजनाथसिंह यांच्या टीमचे अनेक पदाधिकारी म्हणजे उपाध्यक्ष कलराज मिश्र, उमा भारती, स्मृती इराणी, कोषाध्यक्ष पीयूष गोयल, महासचिव अनंत कुमार, धर्मेद्र यादव, थावरचंद गहलोत, सचिव संतोष गंगवार, पक्ष प्रवक्ते प्रकाश जावडेकर आणि निर्मला सीतारमण आदी मोदी सरकारमध्ये मंत्री बनले आहेत़
 
या सर्वाना राजनाथसिंह यांचा कित्ता गिरवत आणि पक्षाच्या एक व्यक्ती, एक पद या सिद्धांतानुसार पक्ष संघटनेतील पद सोडावे लागू शकत़े यासोबत मध्य प्रदेश आणि दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अनुक्रमे नरेंद्रसिंह तोमर आणि डॉ़ हर्षवर्धन यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आह़े

 

Web Title: Success in the strategy of the monkeys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.