शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:43 IST

हरियाणाच्या हरदीप गिलने असंख्य अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे.

हरियाणाच्या हरदीप गिलने असंख्य अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. लहानपणी वडील गेले, आईसोबत शेतात मजुरी केली आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मध्ये सलग ८ वेळा अपयश आलं पण त्याने हार मानली नाही. सैन्यात जाण्याची जिद्द आणि शेतकरी आईचा संघर्ष यामुळेच हरदीप सैन्यात अधिकारी झाला. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.

हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील उचानाजवळील अलीपूर गावातील रहिवासी हरदीपचं जीवन संघर्ष आणि मेहनतीने भरलेलं आहे. तो फक्त २ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्याची आई संत्रो देवी यांनी हरदीप आणि त्याच्या तीन बहिणींना वाढवलं. पण मुलांच्या संगोपनासाठी खूप कष्ट घेतले. हरदीप गिलच्या आईने मुलांच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत केली.

पहाटे लवकर उठून शेतात मजुरी करायच्या आणि दुपारच्या वेळी एका शाळेत मिड-डे मील कर्मचारी म्हणून काम करत असत. त्यांना महिन्याला फक्त ८०० रुपये मिळायचे, ज्यातून कुटुंबाचा खर्च चालायचा. त्यांच्याकडे थोडी शेतजमीन देखील आहे, परंतु त्यातून जास्त उत्पन्न मिळत नव्हते. कशाप्रकारे तरी त्यांनी हरदीपला गावातील शाळेत टाकलं. आर्थिक परिस्थितीमुळे हरदीपला लहान वयातच आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली होती. त्याने आईसोबत शेतात जायला सुरुवात केली. तो दिवसा शेतात काम करायचा आणि दुपारनंतर अभ्यास करायचा.

बारावीनंतर हरदीपला सैन्यात जाण्याचं वेड लागलं. त्याने इंडियन एअर फोर्स (IAF) एअरमनच्या नोकरीसाठी अर्ज केला. परंतु निवड प्रक्रियेदरम्यान छोट्या-छोट्या कमतरतांमुळे त्याची निवड होऊ शकली नाही. तरीही त्याने हार मानली नाही. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, 'मी काही गोष्टी सुधारल्या आणि पुन्हा प्रयत्न केला. जेव्हा एअरमन पदासाठी सुमारे ३००० तरुणांची निवड झाली, तेव्हा मी ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये ५९व्या क्रमांकावर होतो. त्याचवेळी अग्निपथ योजनेमुळे सर्व काही बदललं आणि जॉइनिंग लेटर आलं नाही.'

निराश झालेल्या हरदीपने पुढे IGNOU मधून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, पण तरीही त्याचं एकच ध्येय होतं - सैन्यात जाण्याचं. IGNOU मधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने पुन्हा प्रयत्न केले. त्याने कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षा दिली. हरदीप ९व्या प्रयत्नात सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेत यशस्वी झाला. ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये ५४ वा क्रमांक मिळवून तो IMA मध्ये सहभागी झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's Son Overcomes Poverty, Multiple Failures, Becomes Army Officer

Web Summary : Haryana's Hardeep Gill, son of a farmer, faced poverty and SSB failures. Driven by his mother's struggles and a passion for the army, he persevered, achieving his dream of becoming an officer after nine attempts. His story inspires many.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी