शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

कौतुकास्पद! ब्रेड खाऊन दिवस काढले पण 'त्याने' हार नाही मानली; झाला मोठा अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 13:16 IST

जितेंद्रचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. यानंतर, इयत्ता 9वी ते इंटरमिजिएट, त्याने परिसरातील देवरा बाबा इंटर कॉलेज, दुबार आर्ट्समधून शिक्षण घेतल्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

यूपी पीसीएससाठी, लोक लहानपणापासूनच स्वप्नं पाहतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे बहुतांश उमेदवारांचे स्वप्न असते. पण असे अनेक उमेदवार आहेत जे कमी सुविधांमध्ये आपली स्वप्नं पूर्ण करतात आणि हजारो लोकांसाठी प्रेरणा बनतात. यापैकी एक नाव जितेंद्र कुमार कोल आहे, ज्याची यूपी पीसीएस 2022 परीक्षेत डीएसपी पदासाठी निवड झाली आहे. सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने PCS 2022 (UPPSC PCS 2022 निकाल) मुख्य परीक्षेचा निकाल 7 एप्रिल रोजी जाहीर केला आहे. ज्यामध्ये मिर्झापूर जिल्ह्यातील जितेंद्र कुमार कोल याला 87 वा रँक मिळाला आहे. जितेंद्र कुमार हा लालगंज विकास गटातील जयकर कलान गावचा रहिवासी आहे. जितेंद्रचे सुरुवातीचे शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. यानंतर, इयत्ता 9वी ते इंटरमिजिएट, त्याने परिसरातील देवरा बाबा इंटर कॉलेज, दुबार आर्ट्समधून शिक्षण घेतल्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

वडिलांच्या मृत्यूनंतर खचला नाही 

जितेंद्र कुमारने सांगितले की, तो मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्याचे वडील घरच्या शेतीसोबतच राजकारणात सक्रिय होते. ते कसा तरी अभ्यासाचा खर्च भागवत असे. ऑक्टोबर 2012 मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मी थोडा खचलो होतो. त्यानंतर मला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कुटुंबातील आर्थिक स्रोत मर्यादित असल्याने यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मी माझ्या मित्रांना फोन करून नोकरी मिळवण्याबद्दल बोलू लागलो. त्यावेळी एक वेळ अशीही आली की मित्रांकडून 100 रुपये उसने घेऊन आणि फक्त ब्रेड खाऊन दिवस काढायचो. 

जितेंद्र म्हणाला की, त्या काळात एक चांगली गोष्ट घडली, NET JRF ने MA च्या अंतिम वर्षात पात्रता मिळवली. यानंतर फेलोशिप मिळाल्याने मला माझ्या अभ्यासात खूप मदत झाली. त्याने सांगितले की 2013 मध्ये, पीसीएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तो मार्केटिंग इन्स्पेक्टर बनला. यानंतर, माझी समीक्षा अधिकारी पदासाठीही निवड झाली, परंतु माझे स्वप्न यूपी पीसीएस पात्र होण्याचे होते. 2015 पासून आतापर्यंत मी 7 वेळा Mains आणि 4 वेळा मुलाखत दिली आहे. यावेळी चौथ्या प्रयत्नात यश मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी