शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CBSEच्या पेपर फुटीनंतर उपरोधिक टिवटिवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 23:30 IST

लाखो विद्यार्थ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन ट्विटरसारख्या सोशलमीडियात आधी संताप आणि त्याचवेळी उपरोधिकपणे सरकार आणि बोर्डाला ठोकणाऱ्या, टोचणाऱ्या प्रतिक्रियांचा पूर आला. माजी मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांची तणावग्रस्त भावमुद्रांमधील छायाचित्रे वापरत ट्विट आलं.

नवी दिल्ली- सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर बोर्ड खडबडून जागे झाले. तात्काळ पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाला. त्या निर्णयाचा लाखो विद्यार्थ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन ट्विटरसारख्या सोशलमीडियात आधी संताप आणि त्याचवेळी उपरोधिकपणे सरकार आणि बोर्डाला ठोकणाऱ्या, टोचणाऱ्या प्रतिक्रियांचा पूर आला. माजी मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांची तणावग्रस्त भावमुद्रांमधील छायाचित्रे वापरत ट्विट आलं...विद्यार्थी...जेव्हा त्यांनी ऐकलं की पुन्हा परीक्षा द्यावी लागणार!मोहनिशनं केलेलं ट्विट टीनएजर मुलांचा संताप विनोदी अंगानं व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करणारे आहे. पालक आपल्या मुलाला अहिंसेचे महत्व समजवून सांगत असतात. तेवढ्यात मुलगा म्हणतो, व्वा आता परीक्षा संपली सुट्टी...तेवढ्यात पालक त्याला धपाटा मारुन म्हणतात...पुनर्परीक्षा कोण देणार? धपाट्याबरोबरच अहिंसेचा उपदेशही उडतो!!अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय...आता सीबीएसईने स्वत:ला देशातील सर्वात मोठे बोर्ड म्हणवू नये...आता हे चुकांचे सर्वात मोठे बोर्ड झाले आहे...विद्यार्थ्यांचा तणाव वाढवणारे!इस्ट इंडिया कॉमेडी या लोकप्रिय कॉमेडीच्या हॅंडलने उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवली आहे. “या एकाचवेळी एसएससी बोर्डाच्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या मुलांपेक्षा खूप बरे वाटले असेल!” या शब्दांसोबतची चित्रेही बोलकी. सीबीएसई बोर्ड सांगते...आम्ही मुलांना खूप रगडवून अभ्यास करायला लावतो. त्यांना सुट्टीच्या योजना आखू देतो आणि मग आम्ही अचानक पुनर्परीक्षा जाहीर करतो!धीट मारवाडी या ट्विटर हँडलनेही काहीसं खुपणारं विनोदी ट्विट केलंय. स्माइलींपेक्षाही जास्त खिदळणारा एक चेहरा...सोबत लिहिलंय...”आम्ही एसएससी बोर्डाची मुले!”या उपरोधाला राजकीय फोडणीसुद्धा आहेच. खरेतर राहुल गांधींनी त्यांचे ट्विटर हँडल बदलून सरळ सोपे @RahulGandhi हे घेतले आहे. मात्र आजही त्यांच्या जुन्या हॅंडलशी साधर्म्य राखत एक पॅरोडी हँडल सुरु आहे. त्याने ट्विट केलंय...”२८ लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. हा विदारक विनोद आहे. जबाबदार कोण? मोदीजींनी पुस्तक प्रकाशित केले, एक्झाम वॉरिअर...परीक्षा वीर...मात्र ते त्यांच्या स्वत:च्या मार्केटिंगसाठी होते. आता ते कुठे आहेत...नमोच्या स्पेलिंगची फोडही त्यीं भलतीच केलीय N – No, A – Action, M – Melodrama, O – Only.सर्वात भन्नाट ट्विट फिक्सिटची जाहिरात दाखवणारे...सीबीएसई बोर्डापेक्षा फिक्सिट बरे...लिकेज तरी थांबवते. आणखीही बरेच ट्विट आहेत. बरेचसे संताप व्यक्त करणारे...तसेच काही उपरोधाने टोचणारेही!

टॅग्स :CBSE Paper Leak 2018सीबीएसई पेपरफुटी प्रकरणexamपरीक्षा