शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

"भारतावर सर्जिकल स्ट्राइक केल्यास पाकिस्तानचं अस्तित्वच राहणार नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:36 IST

पाकिस्ताननं सर्जिकल स्ट्राइक केल्यास त्यांचं अस्तित्वत राहणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- भारताने पाकच्या हद्दीत घुसून एक जरी हल्ला केला तर आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू, अशी धमकी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली होती. त्यालाच आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्ताननं सर्जिकल स्ट्राइक केल्यास त्यांचं अस्तित्वत राहणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. त्यांनी पाकिस्तानची तुलना रस्त्यावर मवालीगिरी करणा-या गुंडाशी केली आहे.पाकिस्तान म्हणजे रस्त्यावर मवालीगिरी करणारा गुंड आहे. जो पोलीस आल्यावर पळून जातो. रस्त्यावरचे गुंडच अशा प्रकारची भाषा बोलू शकतात. आम्ही सर्जिकल स्ट्राइक केलं आहे, तुम्ही करून दाखवा, मग पाहू पाकिस्तानचं अस्तित्व राहतं की नाही, असं स्वामी म्हणाले आहेत. रस्त्यावर फिरणा-या गुंडांसारखी विधानं सध्या पाकिस्तान करत सुटला आहे. पोलीस येत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तान अशी गुंडांची भाषा करत राहील आणि एकदा पोलीस आले की तो पळून जाईल, अशी उपरोधिक टीका सुब्रमण्यम स्वामींनी पाकिस्तानवर केली आहे.  लंडन येथील पाकिस्तानच्या लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसमोर गफूर यांनी भारतावर सर्जिकल स्ट्राइक करू, अशी धमकी दिली होती.पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाज्वाही या कार्यक्रमाला उपस्थित होते. तो म्हणाला, जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत, त्यांनी पाकची ताकदही एकदा पाहावी. 50 दशलक्ष डॉलरचा सीपेक कॉरिडॉर पाक लष्कराच्या सुरक्षेखाली आहे. या प्रकल्पामुळे पाकची आर्थिक ताकद वाढेल, असेही गफूर म्हणाले आहेत. पाकच्या प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यांच्यावर कोणतीही बंधने लादलेली नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानमधील वाईटपणापेक्षा चांगल्या विकासकामांवरही लक्ष द्यावे. पाकमध्ये वाईटापेक्षा चांगली कामे जास्त होत आहेत, असेही गफूर म्हणाले होते.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीPakistanपाकिस्तान