शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

Subramanian Swamy on Sri Lanka Crisis: भारत श्रीलंकेत सैन्य पाठविणार? भाजप खासदाराला मोदी सरकारची चपराक; दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:56 IST

Indian Troops in Sri Lanka: श्रीलंकेमध्ये शूट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू, श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी जनतेवर गोळ्या चालविण्यास नकार दिला आहे.  आतापर्यंत श्रीलंकेत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २१९ जण जखमी झाले आहे. मृतामध्ये एका खासदाराचाही समावेश आहे. 

श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारकेड तिकडे भारतीय सैन्य पाठविण्याची मागणी केली होती. यामुळे श्रीलंकेतही मोठी खळबळ उडाली होती. यावर भारताने स्वामींना स्पष्ट शब्दांत नाही, असे उत्तर दिले आहे. 

भारतीय उच्चायोगाने म्हटले की, अशा प्रकारची मागणी आणि विचार ही भारत सरकारच्या अधिकारीक स्थितीला धरून नाहीत. भारत कोणतेही सैन्य श्रीलंकेत पाठविणार नाही, असे म्हटले आहे. स्वामी हे राजपक्षेंचे समर्थक आहेत. त्यांनी अशी मागणी केल्याने श्रीलंकेत तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली होती. 

भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवण्याबाबत मीडिया आणि सोशम मीडियावरील दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने काल स्पष्टपणे सांगितले होते की भारत लोकशाही, आर्थिक परिस्थितीची पुनर्स्थापना आणि श्रीलंकेतील स्थिरता याला पूर्ण पाठिंबा देतो.''.

काय होती स्वामींची मागणी....भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्‍यम स्‍वामी यांनी केंद्र सरकारकडे श्रीलंकेमध्ये आंदोलन शमविण्यासाठी भारतीय सैन्याला पाठविण्याची मागणी केली होती. श्रीलंकेतील परिस्थिती सुधारण्यासाठी भारतीय सैन्याला पाठविण्यात यावे, एका शेजारी देशातील पंतप्रधानांचे घर जाळण्यात आले आहे, मृत खासदारावर गोळ्या झाडण्यात आल्या. याचा अर्थ असे आंदोलक कोणत्याही दयेसाठी पात्र नाहीत. आपण आपल्या शेजारी आणखी एक लिबिया बनण्याची वाट पाहू शकत नाही, असे स्वामी म्हणाले होते. श्रीलंकेमध्ये शूट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू, श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी जनतेवर गोळ्या चालविण्यास नकार दिला आहे.  आतापर्यंत श्रीलंकेत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २१९ जण जखमी झाले आहे. मृतामध्ये एका खासदाराचाही समावेश आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndian Armyभारतीय जवानSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी