शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुबोधकुमार जैस्वाल नवे सीबीआय प्रमुख? उच्चाधिकारप्राप्त समितीकडून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 08:25 IST

Subodh Kumar Jaiswal : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख असू शकतात.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख असू शकतात.सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ज्या तीन नावांचा या पदासाठी विचार सुरू आहे, त्यात जयस्वाल यांचे नाव आहे. उच्चाधिकारप्राप्त समितीकडून ज्या अन्य दोन नावांची निवड झाली आहे, त्यात आंध्र प्रदेश केडरचे व्ही. के. कौमुदी (सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात कार्यरत) आणि बिहार केडरचे अधिकारी कुंवर राजेश चंद्रा (सध्या सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख) यांचा समावेश आहे.या नावांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना आणि एनआयएचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी यांचा समावेश नाही, हे विशेष. असे समजते की, अस्थाना आणि मोदी यांच्या नावावर सहमती झाली नाही; कारण, या दोघांच्या नावाबाबत काही विवाद होते. अचानक झालेल्या घडामोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीने या पदासाठी जयस्वाल, कौमुदी आणि राजेश चंद्रा यांची निवड केली. आता या तीन नावांपैकी एकाची निवड मंत्रिमंडळ समिती (नियुक्त्या) लवकरच करेल. १०९ अधिकाऱ्यांमधून या तिघांची निवड झाली आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याचे संचालक आलोक वर्मा यांच्याशी क्षुल्लक भांडण झाल्यावर अस्थाना यांना सीबीआयमधून दूर करण्यात आले. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना डॉ. वाय. सी. मोदी यांनी क्लीन चिट दिली होती. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) झाली, त्याचे प्रमुख वाय. सी. मोदी होते.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागCentral Governmentकेंद्र सरकार