तलाठी नेमानेंचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर
By admin | Updated: February 22, 2016 00:04 IST
जळगाव: लाचखोर तलाठी सत्यजीत नेमाने यांच्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. त्यामुळे पुढील कारवाईचा निर्णय आता जिल्हाधिकारीच घेतील.सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्विकारताना नेमाने व सेवानिवृत्त कोतवाल उखर्डु पांडू सोनवणे या दोघांना गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
तलाठी नेमानेंचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर
जळगाव: लाचखोर तलाठी सत्यजीत नेमाने यांच्याबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला. त्यामुळे पुढील कारवाईचा निर्णय आता जिल्हाधिकारीच घेतील.सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयाची लाच स्विकारताना नेमाने व सेवानिवृत्त कोतवाल उखर्डु पांडू सोनवणे या दोघांना गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. दोघांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेतांना पकडले त्याच दिवशी उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी नेमाने यांच्या घराचा झडती घेतली होती, मात्र त्यात नियमित वस्तूव्यतिरिक्त संशयास्पद काहीच आढळून आले नाही. लाचेची कारवाई केल्यानंतर त्याचा विस्तृत अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालावरुन नेमाने यांच्यावर निलंबनाचीच कारवाई होण्याचे संकेत आहेत.यापुर्वीही त्यांना एक वेळा निलंबित करण्यात आले होते.पाच महिन्यापूर्वी झाली होती संपत्तीची चौकशी दरम्यान, तत्कालिन उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्या कार्यकाळात पाच ते सहा महिन्यापूर्वी नेमाने यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांच्या मालमत्ता व संपत्तीबाबत सध्या तरी कोणाचीच मागणी अथवा तक्रार नाही, परंतु तसा लेखी अर्ज व मागणी झाली तर नक्कीच चौकशी केली जाईल, अशी माहिती पराग सोनवणे यांनी दिली.