शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लालूपुत्राला महागात पडला स्टंट; तेज प्रताप यादवांची सायकलयात्रा आपटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:22 IST

पेट्रोल डिझेल दरांच्याविरोधात काढलेली ही सायकलयात्रा पाटण्यात चर्चेचा विषय झाली आहे.

पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पूत्र तेजप्रताप सध्या चांगलेच जोशात आहेत. कोठे गरिबा घरी जेवण कर तर सार्वजनिक बोअरपंपावर अंघोळ कर असले कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतले आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकांच्या आधी आपल्या पक्षाची प्रतिमा सर्वव्यापी, सर्वसमावेशक व्हावी यासाठी तेजप्रताप यांचा आटापिटा सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणू काढलेली सायकलयात्रा तेजप्रताप यांना चांगलीच महागात पडली आहे.त्याचं झालं असं तेजप्रताप यांनी सायकल यात्रा काढून पाटणा शहरात सायकल चालवायला सुरु केली. यावेळेस त्यांच्या आजूबाजूला राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही होते. या यात्रेत अचानक काहीतरी मनात आलं आणि तेजप्रताप यांनी वेगात सायकल चालवायला सुरु केली. त्यांच्यापाठोपाठ राजद कार्यकर्त्यांनाही वेगात जावं लागलं. याच धांदलीमध्ये तेजप्रताप यादव सायकलवरुन खाली पडले. हा  सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकार्ड झाला असून त्याची क्लिप वायरल झाली आहे. सायकलवर पडल्यावर तेजप्रताप लगेच उभेही राहिले मात्र तोपर्यंत सर्व प्रकार कॅमेराबद्ध झाला होता. तेजप्रताप हे सध्या अशाच प्रकारच्या मोहिमांमध्ये व्यग्र आहेत. पेट्रोल डिझेल दरांच्याविरोधात काढलेली ही सायकलयात्रा पाटण्यात चर्चेचा विषय झाली आहे.

अलीकडे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वत:च्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले होते. ‘रुद्रा द अवतार’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या पोस्टरवर तेजप्रताप डॅशिंग अवतारात दिसतं आहेत. नेमक्या याच चित्रपटासाठी तेजप्रताप जिममध्ये घाम गाळत आहेत. त्यांच्या सोशल अकाऊंटवर म्हणूनच रोज नवा वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट होतोय. तूर्तास या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण तेजप्रताप यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाची कथा बिहारची आहे आणि बिहारमध्येच त्याचे शूटींग होणार आहे.खरे तर वडिल राजकारणात असले तरी तेजप्रताप यांचा कल कायम अभिनयाकडेच राहिला. यापूर्वी बिहारचे आरोग्यमंत्री असताना त्यांनी एका भोजपुरी चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. पण दुर्दैवाने तो चित्रपट रिलीज झाला नव्हता. आता मात्र तेजप्रताप यांनी जोरदार तयारी केली आहे. यावेळी कुठलीही माघार नाही, कुठलीही कसूर नाही, हेच जणू त्यांनी ठरवलेय. बॉलिवूडच्या हिरोंच्या रांगेत बसायचे म्हटल्यावर इतके करणे तर भाग आहे, होय ना?

टॅग्स :Tej Pratap Yadavतेज प्रताप यादव