शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रोज आठ तास घरीच अभ्यास; मेहनतीचे फळ मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 05:58 IST

यूपीएससीत प्रथम आलेली ईशिता गरिबांच्या प्रगतीसाठी झटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत ईशिता किशोरने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ईशिताने सांगितले की, ती परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातून किमान आठ-नऊ तास घरामध्येच अभ्यास करायची. हे यश माझ्या मेहनतीचे फळ आहे.

हवाई दलातील अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या ईशिताने (२६) सांगितले की, आयएएस अधिकारी झाल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी काम करेल. ती म्हणाली की, मला पहिला क्रमांक मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आता गरिबांच्या प्रगतीसाठी झटणार आहे.

कुटुंब ठामपणे मागेकुटुंबाने सतत प्रोत्साहन दिले. ती म्हणाली की, मला पहिल्या दोन प्रयत्नात परीक्षा पास करता आली नाही तेव्हा माझ्या पाठीशी माझे कुटुंब ठामपणे उभे राहिले. त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यांचे आभार, अशी ती म्हणाली.

इतरांना सल्ला काय? माझ्या वडिलांना त्यांच्या कामातून समाधान मिळत असे. अभ्यास करताना कधीही तास मोजून अभ्यास करू नका, स्वतःचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा, असे तिने यावेळी सांगितले.

मी घरीच अभ्यास केला. मी रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत अभ्यास करायचे, कारण त्यावेळी कुठेही गडबड नसते, खूप शांतता असल्याने मन लावून अभ्यास करता येतो. - गरिमा लोहिया, बक्सर, यूपीएससीमध्ये द्वितीय क्रमांक

मी लोकांना सांगू इच्छिते की, या परीक्षेसाठी (यूपीएससी) खूप मेहनत घ्यावी लागते; परंतु प्रत्येक माणसामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता असते. संयम आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असलेले कोणीही यात उत्तीर्ण होऊ शकते.- प्रसनजीत कौर, श्रीनगर, यूपीएससीमध्ये ११वा क्रमांक

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग