अण्णासाहेब तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी-पालक मेळावा
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
पंचवटी : दिंडोरीरोड परिसरातील नाशिक इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) संचलित अण्णासाहेब पाटील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी पालक-मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने हे उपस्थित होते. यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी तंत्रनिकेतनचे संस्थापक, अध्यक्ष सुरेश पाटील, प्राचार्य योगेश कर्पे, प्रा. रमेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. तंत्रशिक्षणात केवळ उत्तीर्ण होण्यास महत्त्व नसून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करून दर्जेदार तांत्रिक ज्ञान मिळवावे, असा सल्ला सुरेश पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.