शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या आयचा घो! NEET परीक्षेत भोपळा तरी मिळाला MBBS ला प्रवेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 11:25 IST

NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

नवी दिल्ली -  आपल्या देशात शिक्षणव्यवस्थेचा मांडला गेलेला बाजार ही आता नवी बाब राहिलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता नसलेल्यांनाही पैशाच्या बळावर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2017 साली एमबीबीएससाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित होणाऱ्या NEET परीक्षेत फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांमध्ये सुमारे 400 विद्यार्थ्यांना दहापेक्षा कमी तर 110 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे जर शून्य गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असेल तर ही परीक्षा आयोजित करण्याचे औचित्यच काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने  2017 साली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आणि 150 हून कमी गुण असलेल्या 1990 विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण केले होते. त्यामधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली असता 530 विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा दोन्ही विषयांत दहापेक्षा कमी किंवा शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे.   सुरुवातीला सामुहिक प्रवेश परीक्षेसाठी बनवण्यात आलेल्या नियमानुसार प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले होते. मात्र नव्या नियमावलीमध्ये पर्सेंटाइल सिस्टिमचा स्वीकार करण्यात आला असून, या नियमानुसार अनिवार्य गुणांचा नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये शून्य किंवा एकेरी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू लागला आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाeducationशैक्षणिक