शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: भररस्त्यात हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत विद्यार्थ्याची हत्या, लोक फक्त तमाशा पाहत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:10 IST

मारहाण केल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला असतानाही त्याच्यावर विटा, काठी आणि लोखंडी रॉडने वार करण्यात आले

अलाहाबाद - देशभरातील गुन्हेगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नसून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका 26 वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. मारहाण केल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला असतानाही त्याच्यावर विटा, काठी आणि लोखंडी रॉडने वार करण्यात आले. कोमात गेलेल्या तरुणाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, मुख्य आरोपी मात्र फरार आहे. अलाहाबादमध्ये ही घटना घडली आहे. 

हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव दिलीप सरोज असं आहे. दिलीप आपल्या दोन मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी काही लोकांसोबत त्याची शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर त्यांनी दिलीपवर हल्ला करत त्याची हत्या करुन टाकली. दिलीप बेशुद्द पडला असतानाही त्याच्यावर हल्ला होत असतानाचा व्हिडीओ एक व्यक्तीने शूट केला आहे. या व्हिडीओत बेशुद्ध अवस्थेतही दिलीपवर विटा फेकल्या जात असून लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिकने मारहाण होत असल्याचं दिसत आहे. 

ही दृश्यं विचलित करु शकतात

हल्ला करणारे सर्वजण दारुच्या नशेत असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भररस्त्यात ही घटना घडत असतानाही तेथून जाणारी एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. ज्यांनी व्हिडीओ काढला त्यांनीदेखील मदत केली की नाही हे कळू शकलं नाही. 

दिलीपचा मित्र प्रकाश सिंह या घटनेचा साक्षीदार असून त्याने सांगितलं की, 'आम्ही डिनरसाठी कालिका रेस्टॉरंटमध्ये गेला होतो. डिनरनंतर आम्ही रेस्टॉरंटच्या पाय-यांवर बसलो होतो. त्यावेळी तिघे आले आणि आम्हाला धक्काबुक्की करत, शिव्या देत रेस्टॉरंटमध्ये निघून गेले. आम्ही त्यांच्यामागून गेलो आणि जाब विचारला असता त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्यावर खुर्ची फेकली. पण मी तेथू निसटलो'.

व्हिडीओत लेदर जॅकेटमध्ये दिसणारी व्यक्ती रेस्टॉरंटचा मालक असल्याची माहिती मिळाली असून, तो मारेक-याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर तरुणाचा मृतदेह बाईकवरुन नेण्याचाही तो प्रयत्न करत आहे. पण दुर्देवाने दिलीप कोमात गेला होता, आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी रेस्टॉरंटच्या एका वेटरला अटक केली असून मुख्य आरोपी विजय शंकर सिंह मात्र फरार आहे.