शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर ३ किमी धावले; कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 05:57 IST

मध्य बंगळुरू ते मनिपाल रुग्णालय, सरजापूर असा डॉ. नंदकुमार यांचा दररोजचा प्रवास आहे. ३० ऑगस्ट रोजीही ते वेळेवर घरून निघाले होते.

बंगळुरू : येथील एका डॉक्टरने सेवावृत्तीचा असा काही वस्तुपाठ घालून दिला की जो पण त्यांच्याविषयी ऐकत आहे तो त्यांची प्रशंसाच करत आहे. या डॉक्टरांची कार वाहतूक कोंडीत अडकली होती. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी कार सोडून तीन किलोमीटर धावत त्यांनी रुग्णालय गाठले आणि रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रियाही केली. डॉ. गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव असून, ते गॅस्ट्रोएन्टॅरोलॉजिस्ट आहेत.  

मध्य बंगळुरू ते मनिपाल रुग्णालय, सरजापूर असा डॉ. नंदकुमार यांचा दररोजचा प्रवास आहे. ३० ऑगस्ट रोजीही ते वेळेवर घरून निघाले होते. त्या दिवशी एका महिलेवर तातडीची लॅप्रॉस्कोपिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियागारात सर्व तयारी झाली होती. कर्मचारी वृंद सज्ज होता. मात्र, वाटेत सरजापूर-मराठल्ली येथे नंदकुमार यांची कार वाहतूक कोंडीत अडकली. बंगळुरूत वाहतूक कोंडी नियमित बाब आहे. ही कोंडी फुटण्यासाठी बराच वेळ लागणार होता. एवढा वेळ थांबणे रुग्णाच्या दृष्टीने ठीक नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगल मॅपवर रुग्णालयाचे अंतर तपासले. मॅॅप जवळपास ३ कि. मी. अंतर असल्याचे दाखवत होता. त्यानंतर त्यांनी कारला चालकासह सोडून देत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली व वेळेवर रुग्णालयात पोहोचून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. 

कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडलेडाॅ. नंदकुमार यांनी त्यांचा धावण्याचा एक छोटा व्हिडीओ बनवला होता. तो त्यांनी सोमवारी समाजमाध्यमावर शेअर केला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला अशा स्थितीचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. बंगळुरूच्या अनेक भागात अनेकवेळा पायपीट करावी लागते. कधीकधी रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. त्या दिवशी रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीयही डॉक्टरांची प्रतीक्षा करत होते. एखादी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली तर रुग्णाचे काय होईल, असाच विचार सगळे करीत होते. कारण, तेथे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागाच नव्हती, असे ते म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टर