शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’चा डेटा लीक झाल्यास कठोर कारवाई होणार; निवडणूक आयाेगाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 08:22 IST

निवडणूक आयोगाने दुहेरी नोंदणी हटविण्यासाठी आधारला मतदार ओळखपत्र जोडण्यास परवानगी देण्यासाठी नियम जारी केल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : मतदारांनी आधार डेटा शेअर करण्यासाठी भरलेल्या अर्जातून कोणतीही माहिती फुटल्यास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.

निवडणूक आयोगाने दुहेरी नोंदणी हटविण्यासाठी आधारला मतदार ओळखपत्र जोडण्यास परवानगी देण्यासाठी नियम जारी केल्यानंतर काही दिवसांनी हा इशारा दिला आहे. मतदारांनी आधार डेटा शेअर करणे स्वैच्छिक आहे, यावरही आयोगाने भर दिला आहे. चार जुलै रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पुनरिक्षणाच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेऊन मतदारांकडून लिखित स्वरूपात फॉर्म ६-बीमध्ये स्वेच्छेने आधार नंबर देण्यासाठी राजी केले जाऊ शकते. विधी मंत्रालयाच्या एका अधिसूचनेनुसार, अलीकडेच सादर केलेल्या फॉर्म-६ बी द्वारे मतदार आपला आधार नंबर शेअर करू शकतात.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आधारचा तपशील शेअर करणे स्वैच्छिक आहे. आधार नंबर मागण्याचा उद्देश मतदार यादीत त्याची नोंद करणे व भविष्यात अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आहे, हे मतदाराला सांगण्यात यावे. एखादा मतदार आधार नंबर देण्यास असमर्थता दर्शवित असेल तर मतदार यादीतील कोणतीही नोंद हटविली जाणार नाही.

निवडणूक आयाेगाचा इशारा मतदाराची माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर करणे आवश्यक असल्यास त्यातील आधार डेटा हटवला पाहिजे किंवा तो लपवला पाहिजे. आधार नंबरने सुसज्ज अशा फॉर्म-६बी च्या हार्ड कॉपीचे संरक्षण करण्यासाठी आधार (प्रमाणीकरण व ऑफलाइन सत्यापन) विनिमय-२०२२ च्या तरतुदींचे कठोरपणे पालन करावे. 

लोकांचे आधार नंबर प्राप्त करणारी संस्था हार्ड कॉपीच्या प्रती संग्रहित करण्यापूर्वी पहिले ८ अंक लपवून ठेवेल, अशीही यात तरतूद आहे. मतदारांकडून गोळा केलेले फॉर्म ६-बीला अटॅचमेंटसह डिजिटायझेशननंतर ईआरओकडून दुहेरी लॉकने सुरक्षित ठेवण्यात येईल. हा फॉर्म लीक झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAdhar Cardआधार कार्ड