शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पोटापुरत्या धान्यासाठी फिरवाफिरव तहसीलदारांकडे मांडले गार्‍हाणे : प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम

By admin | Updated: January 3, 2017 19:25 IST

जळगाव : प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गत तयार केलेला प्रस्ताव स्विकारण्यासाठी गोरगरीब नागरिकांची प्रशासन व कामगार संघटना यांच्याकडे फिरवाफिरव सुरु आहे. संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी तहसीलदार अमोल निकम यांची भेट घेत गार्‍हाणे मांडले. मात्र नेमका प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम कायम आहे.

जळगाव : प्राधान्य कुटुंब योजनेतंर्गत तयार केलेला प्रस्ताव स्विकारण्यासाठी गोरगरीब नागरिकांची प्रशासन व कामगार संघटना यांच्याकडे फिरवाफिरव सुरु आहे. संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी तहसीलदार अमोल निकम यांची भेट घेत गार्‍हाणे मांडले. मात्र नेमका प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम कायम आहे.
पोटापुरत्या धान्यासाठी धावाधाव
राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत तालुकानिहाय लक्षांक देण्यात आला आहे. अल्पदरात आणि पोटापुरते धान्य आपल्यालाही मिळावे यासाठी महिला, वृद्ध, अपंग, विधवा यांनी तलाठी कार्यालयातून दाखले घेत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सेतू कार्यालयात सुरु केलेली गर्दी आजही कायम आहे.
प्रस्ताव कुणी स्विकारावा याबाबत संभ्रम
सेतू सुविधा केंद्रातून उत्पन्नाचा दाखला मिळाल्यानंतर नागरिकांनी रेशनकार्ड, आधारकार्ड व उत्पन्नाच्या दाखल्याची झेरॉक्स जमा करण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत. मंगळवारी या ठिकाणी कुणीही नसल्याने काही महिलांनी सेतू सुविधा केंद्रात विचारणा केली. या ठिकाणी बी.जे.मार्केटमधील कामगार संघटनेच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करावे अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार काही नागरिक या ठिकाणी दाखल झाले.
प्रशासन व कामगार संघटनेकडून टोलवाटोलव
खान्देश कामगार संघटनेतर्फे गरीबांना रेशनवरून धान्य मिळावे यासाठी मोर्चा काढण्यात येऊन सुमारे साडे चार हजार नागरिकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. प्राधान्य कुटुंब योजनेसाठी इष्टांक आल्यानंतर तालुका पुरवठा विभागातर्फे संघटक विकास आळवणी यांना पत्र देऊन उत्पन्नाचे दाखले व आधारकार्ड सादर करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. त्यानुसार त्यांनी सुमारे ४ हजार नागरिकांचे प्रस्ताव स्विकारले आहेत. मंगळवारपासून येत असलेले प्रस्ताव त्यांनी स्विकारणे बंद केले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत नागरिक ताटकळत उभे होते.
तहसीलदारांसमोर मांडले गार्‍हाणे
प्रशासन व कामगार संघटना कोठेचे प्रस्ताव स्विकारले जात नसल्याने संतप्त झालेल्या काही महिला व नागरिकांनी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास तहसीलदार अमोल निकम यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले. निकम यांनी प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत मंजूर इष्टांक व येणार्‍या प्रस्तावांची संख्या याबाबत माहिती देत यासाठी अंध, अपंग, विधवा, रोगग्रस्त नागरिकांना प्राधान्य देऊन नंतर उर्वरित अर्जाचा विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
संभ्रम कोण निर्माण करतंय?
प्राधान्य कुटुंब योजनेत समावेशासाठी प्रस्ताव तयार करून स्विकारण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र नागरिकांना खान्देश कामगार संघटनेकडे पाठविले जात आहे. हा संभ्रम कोण निर्माण करीत आहेत.