शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देश उन्नत अन् सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व बळकट करा; सुधीर मुनगंटीवर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:05 IST

मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा येथे आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनात ते बोलत होते.

विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावर भारताला प्रत्येक क्षेत्रात "नंबर वन" करण्यासाठी नवीनतम संकल्पनांसह अविश्रांत प्रयत्न सुरू केले आहेत; देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व बळकट करण्याची जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची असून त्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन महाराष्ट्राचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा येथे आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनात ते बोलत होते. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा मायावी राक्षसाप्रमाणे आहे; सतत खोटे बोलून जनतेला संभ्रमात टाकण्याचा  कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न असतो, तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे निष्ठा आहे. परिश्रमाची तयारी आहे. राष्ट्रभावना ओतप्रोत भरून आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. नरेंद्र मोदी यांना आपल्यासारख्या निष्ठावान साथीदारांची आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्ही तयार रहा असे, आवाहन मुनगंटीवार यांनी केले.  

काँग्रेसने महिला, युवक, आदिवासी, सामान्य जनता, व्यापारी कुणाचेच भले केलेले नाही. जाती जातीत तेढ निर्माण करणे हाच काँग्रेसचा कार्यक्रम आहे. त्यामुळे जनतेला आपण सावध केले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत अन्न धान्य पुरविले, जे जगात कोणीही करू शकलेले नाही. माझा एकही देशबंधव संकटकाळात उपाशी झोपता कामा नये, हा एकच ध्यास घेऊन मोदी काम करीत होते, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा