शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजब वास्तव! 'या' राज्यात सफाई कामगार अन् ड्रायव्हरचा पगार IAS अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त! मुख्य सचिवांचा धक्कादायक खुलासा; जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:15 IST

धक्कादायक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे, राज्यातील काही वरिष्ठ सफाई कामगार आणि ड्रायव्हर्सचा पगार हा चक्क आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्यपालांच्या पगारापेक्षाही अधिक झाला आहे...

तेलंगणाच्या आर्थिक स्थितीसंदर्भात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हैदराबादमधील 'सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड सोशल स्टडीज' (CESS) तर्फे आयोजित १६ व्या वित्त आयोगाच्या परिषदेत राज्याचे मुख्य सचिव के. रामकृष्ण राव यांनी बुधवारी (२५ फेब्रुवारी २०२६) राज्याच्या वाढत्या आर्थिक बोजासंदर्भात अत्यंत धक्कादायक भाष्य केले आहे. गेल्या दहा वर्षांत तेलंगणाचा मासिक वेतन आणि पेन्शन खर्च तब्बल चार पटींनी वाढला असून तो ६००० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. धक्कादायक आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे, राज्यातील काही वरिष्ठ सफाई कामगार आणि ड्रायव्हर्सचा पगार हा चक्क आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्यपालांच्या पगारापेक्षाही अधिक झाला आहे.

"सातत्याने होणाऱ्या वेतन सुधारणेमुळे अशी परिस्थिती येऊन उभी ठाकली" -तेलंगणा राज्याची निर्मिती २०१४ मध्ये झाली. आंध्र प्रदेशचे दोन राज्यांत रुपांतर होऊन तेलंगणा राज्य जन्माला आले. निर्मिती वेळी वेतन आणि पेन्शनचे एकूण बिल १,५०० कोटी रुपये महिना एवढे होते. जे आता ३०० टक्क्यांच्या वाढीसह ६००० कोटींच्याही वर पोहोचले आहे. मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये सातत्याने होणाऱ्या वेतन सुधारणेमुळे अशी परिस्थिती येऊन उभी ठाकली आहे. 

सफाई कर्मचाऱ्याला २ लाख, ड्रायव्हरला १ लाख पगार - मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, वीज विभागातील मुख्य अभियंत्यांचे वेतन ७ लाख रुपयांपर्यंत पोहोचले असून, ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेले सफाई कर्मचारी २ लाख रुपये, तर ड्रायव्हर्स १ लाख रुपयांहून अधिक वेतन घेत आहेत. जीएचएमसी (GHMC) मधील नियमित सफाई कर्मचाऱ्यांना सरासरी ७० हजार रुपये वेतन आणि भत्ते मिळतात. तसेच नव्याने रुजू झाल्या कर्मचाऱ्यांचे वेतन 28,000 रुपयांपेक्षाही अधिक आहे.

काय आहे वेतनवाढीचं नेमकं कारण? -वेतन सुधारणा आयोगाकडून वाढवला जाणारा 'फिटमेंट' टक्का आणि महागाई भत्ता ही या अवाढव्य वेतनवाढीमागील मुख्य कारणे आहेत. अनेकदा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले जातात, ज्यामुळे कर्मचारी वर्गाला फायदा होतो, मात्र राज्याच्या निश्चित खर्चाच प्रचंड वाढ होते. वीज विभागात दर चार वर्षांनी होणाऱ्या वेतन सुधारणेमुळे ही विसंगती निर्माण झाली आहे.

या खुलाशामुळे तेलंगणा सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महसुलाचा मोठा हिस्सा केवळ वेतन आणि पेन्शनमध्ये जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana: Sanitation workers, drivers earn more than IAS officers!

Web Summary : Telangana faces financial strain as some sanitation workers and drivers earn more than IAS officers due to rising wages and pension costs which have increased fourfold in ten years, reaching ₹6000 crores monthly.
टॅग्स :TelanganaतेलंगणाGovernmentसरकार