शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रद्द करा! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधी यांना पत्र, कारणही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:14 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली-

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं कडक पालन केलं जावं आणि प्रोटोकॉलचं पालन करणं जमत नसेल तर यात्रा देशाचं हित पाहून यात्रा स्थगित करा, असं मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

"राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा. तसंच केवळ कोरोना लसीकरण पूर्ण केलेलेच लोक यात्रेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. तसंच यात्रेत सामील होण्याआधी आणि नंतर लोकांचं आयसोलेशन केलं जावं", असं मनसुख मांडविय यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर पब्लिक हेल्थ इमर्जंन्सीची स्थिती लक्षात घेऊन कोरोना महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी स्थगित करावी असंही मांडविय यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राजस्थानच्या खासदारांनी केली होती तक्रारराजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवची पटेल यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत कोरोना महामारीचा प्रसार होत असल्याची तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राजस्थानमध्ये सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात देशातील विविध राज्यांचे लोक सहभागी होत आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून राजस्थानात कोरोना प्रसाराचा धोका आहे. तसंच यात्रेत सामील होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं देखील आढळून आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू देखील यात्रेतून माघारी परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा रद्द केली जावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या