शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अभिनेते कमल हसन यांच्यावर हल्ला, सभेनंतर फेकली अंडी आणि दगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:32 IST

नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. असे वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे.

चेन्नई - नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. असे वक्तव्य करणारा अभिनेता कमल हसन यांना सातत्याने विरोधाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान, कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण असा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे. कमल हसन यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरवण्यात आल्याने पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, कोईंबतूरमधील सुलूर येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कमल हसन यांना परवानगीन देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले की, ''आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे असे मला वाटते. मात्र असा प्रकारांमुळे मी घाबरलेलो नाही. प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आम्ही खूप पवित्र आहोत असा दावा कुठलाही धर्म करू शकत नाही. प्रत्येक धर्मात अतिरेकी होते हे इतिहास सांगतो.''  

तसेच नथुराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटल्याने निर्माण झालेल्या वादाबाबतही कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली. ''मी अटकेला घाबरत नाही. मला अटक करून दाखवा. पण मला अटक केल्यास ते त्यांनाच अधिक अडचणीचे ठरणार आहे. हा इशारा नाही सल्ला आहे.''असा टोलाही कमल हसन यांनी लगावला.  

 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनTamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारण