शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनाआधीच वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक, अनेक डब्यांचं नुकसान, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 14:43 IST

Stone Pelting On Vande Bharat Train: छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली.

छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बागबाहरा रेल्वेस्टेशन जवळ वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ट्रेनच्या तीन डब्यांचं नुकसान झालं. या ट्रेनची शुक्रवारी रायपूर ते विशाखापट्टणम दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, विशाखापट्टणम येथून परतताना या ट्रेनवर दगडफेक करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनला रवाना करणार आहेत‌. दरम्यान, उद्घाटनापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपास करत आरपीएफने ५ आरोपींना अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रायपूर विशाखापट्टणम वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन घेण्यात आली ही ट्रेन सकाळी ७ वाजता रवाना झाली. सकाळी नऊ वाजता ही गाडी बागबाहराजवळ पोहोचली असताना काही समाजकंटकांनी धावत्या ट्रेनवर दगडफेक केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेत पाच जणांना अटक केली आहे‌‌. सर्व आरोपी समाजकंटक असून ते बागबाहरा येथीलच रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेChhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी