शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजून तरी मी ‘माजी’ वित्तमंत्री नाही, सिन्हा, चिदंबरम यांच्यावर जेटलींनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 00:22 IST

माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले.

नवी दिल्ली - माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले.धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही, असेही ते म्हणाले.सन 1999मध्ये संसदेत बोफोर्स प्रकरणावर बोलण्याच्या वेळी कोणावरही व्यक्तिगत टीका न करण्याचा सूज्ञ सल्ला ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्याला दिला होता. याचे स्मरण देत जेटली म्हणाले की, व्यक्तींना लक्ष्य केल्यावर मुद्द्यांना बगल देणे सोपे जाते. जेटली म्हणाले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे वित्तमंत्री म्हणून माझे गुणवान पूर्वसुरी आहेत आणि इतर पूर्वसुरी (सिन्हा व चिदंबरम) गळ्यात गळे घालणारे आहेत!

80व्या वर्षीही इच्छुक!ज्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्याचे शीर्षक ‘इंडिया@ 70 मोदी@ 3.5’ असे होते. सरकारमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून नाराज झालेले सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही पदासाठी हपापलेले आहेत, असे अप्रत्यक्षपणे सुचवत जेटली म्हणाले की, खरे तर या पुस्तकाचे शीर्षक ‘इंडिया@ 70 मोदी@ 3.5 अ‍ॅण्ड ए जॉब अ‍ॅप्लिकंट @ 80’ असे हवे होते.