शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दहशतविरोधी कारवायांपासून दूर राहा, अन्यथा...- हिज्बुलची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 9:31 PM

कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीननं भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना गंभीर इशारा दिला आहे.

जम्मू- काश्मीर- कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीननं भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना गंभीर इशारा दिला आहे. दहशतविरोधी कारवायांपासून दूर राहा, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा आव्हानच हिज्बुलनं दिलं आहे. हिज्बुलच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सोडून दिल्याचा दावा केला आहे. हिज्बुलचा कमांडर रियाज नायकूनं सर्व अपहरण केलेल्या लोकांना सोडल्याची माहिती दिली आहे.लष्कराच्या दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होऊ नका, अन्यथा तुमच्या कुटुंबीयांना आम्ही लक्ष्य करू, असा इशारा हिज्बुलच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधल्या पोलिसांना दिला आहे. पोलिसांना आपल्या माणसांच्या जाण्याचं दुःख काय असतं हे दाखवून देण्याच्या उद्देशानंच त्यांच्या कुटुंबीयांचं अपहरण केल्याची माहिती नायकूनं दिली आहे. आम्ही जेव्हा ठरवू तेव्हा पोलिसांच्या घरांना लक्ष्य करू शकतो. नायकूनं व्हिडीओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे.आमची लढाई पोलिसांशी नाही. पोलीस आम्हाला त्यांच्याशी लढण्यास भाग पाडत आहेत. व्हिडीओ संदेशमध्ये नायकू म्हणतो, आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, भारत देश हा आपला मित्र नाही आणि आम्हाला शेख अब्दुल्लांकडून धडे गिरवण्याची गरज आहे. भारत काश्मिरी लोकांचं विभाजन करण्याला प्राधान्य देतोय. पोलीस यात मधल्या मध्ये भरडले जातायत. आमचं युद्ध जम्मू-काश्मीरच्या पोलिसांशी नाही. परंतु दुर्दैवानं त्यांचा आमच्याविरोधात वापर केला जातोय. आम्ही तुम्हाला नुकसान पोहोचवू इच्छित नाही. परंतु स्वकीय गेल्याचं दुःख काय असतं, याची जाणीव करून देऊ इच्छितो. काश्मिरी लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण गमावले आहेत. पोलिसांनी काश्मिरी तरुणांचं भवितव्य उद्ध्वस्त करू नये. आमची लढाई पोलिसांच्या कुटुंबीयांशी नव्हे, तर लष्कराशी आहे, असंही नायकूनं स्पष्ट केलं आहे. 

दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याचे पोलीस खात्यांमधील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादी