शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

''वित्त आयोगाच्या शर्ती बदलताना राज्यांना विश्वासात घ्यायला हवे होते''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 07:11 IST

१५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलताना केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे.

नवी दिल्ली : १५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलताना केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे. संघराज्य व्यवस्थेत एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही, असेही मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे.जुलैमध्ये केंद्र सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती बदलून आयोगास संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी व्यपगत (लॅप्स) न होणाऱ्या निधीची तरतूद कशी करावी, याचा मार्ग सुचविण्यास सांगितले आहे. त्यानुषंगाने मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘१५ व्या वित्त आयोगाच्या संदर्भ शर्ती’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.मनमोहनसिंग यांनी सांगितले की, समितीची मुदत संपत आलेली असताना तिच्या संदर्भ शर्तींमध्ये बदल करताना राज्यांशी सल्लामसलत करायला हवी होती. केंद्र सरकारला वित्त आयोगाच्या संदर्भ शर्तींमध्ये बदल करायचाच असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने तो करणे अधिक योग्य आहे. अन्यथा केंद्र सरकार आपले हक्क हिरावून घेत आहे, अशी राज्यांची भावना होऊ शकते. संदर्भ शर्तींत परस्पर बदल करणे हे आपण स्वीकारलेल्या संघराज्य पद्धतीसाठी तसेच सहकारी संघ पद्धतीसाठी चांगले नाही, असे मला वाटते. मनमोहनसिंग यांनी म्हटले की, वित्त आयोगाचा अहवाल वित्त मंत्रालयाकडे जातो. तेथून तो मंत्रिमंडळाकडे जातो. त्यामुळे नाखुश राज्य आयोगांवर आपला एकतर्फी निर्णय लादण्याऐवजी संसदेचा जो काही जनादेश आहे, त्याचा आम्ही सन्मान करू, असा दृष्टिकोन सरकार स्वीकारू शकते. एन. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील वित्त आयोग ३० आॅक्टोबर २०१९ रोजी आपला अहवाल सादर करणार होता.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी