शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या नुकसानीपोटी राज्याला मिळाले फक्त ६९.७६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:47 IST

बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्टÑ सरकारने केंद्राकडे ३३७३.३१ कोटींची भरपाई मागितली होती. राज्य सरकारने केंद्राला पाठविलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालात भरपाईनिधीबाबत कमालीचा विरोधाभास असल्याने महाराष्टÑाच्या पदरात मागणीपेक्षा अत्यंत तोडका निधी पडला आहे.औरंगाबाद, जालना, बुलडाणा व अकोला या जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने शंभर टक्के भरपाईची मागणी केली होती; परंतु, वस्तुस्थितीच्या आकलनानुसार मागणीत तथ्य नसल्याचे आढळले. त्यामुळे केंद्र सरकारने ‘एनसीसीएफ’नुसार महाराष्टÑाच्या भरपाई निधीत कपात केली गेली, असे केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.महाराष्टÑ सरकारने पिकांच्या नुकसान भरपाईसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्रीय कृषि सचिव एस. के. पटनायक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीला अहवाल सादर केला होता. बोंडअळीने नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये कपाशी आणि २०१८ मध्ये धान पिकाच्या नुकसानीपोटी २४२५.५३ कोटींची भरपाई मागितली होती.कृषि मंत्रालयाच्या आक्षेपानंतर महाराष्टÑ सरकारने मार्च २०१८ मध्ये पुन्हा सुधारित अहवाल पाठविला. यात भरपाईची रक्कम वाढवून ३३७३.३१ कोटी नमूद करण्यात आली, असे या समितीने निदर्शनास आणून दिले.>१६,३३५ कोटींचा निधी मंजूरकपाशीचे जेवढे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले, तेवढे झालेले नाही, असे राज्य सरकारच्याच एका मंत्र्यांने स्पष्ट केले होते. कृषि मंत्रालयाच्या पाहणी पथकानेही महाराष्टÑातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना भेट दिली असता, खरीप हंगामात दोनदा कापूस वेचणी झाल्याचे निष्पन्न झाले होते. महाराष्ट्राला २०१७-१८ साठी महाराष्टÑाला राज्य आपत्ती निधीखाली १६३३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात केंद्राचा ७५ आणि राज्य सरकारचा २५ टक्के हिस्सा असतो.

टॅग्स :Farmerशेतकरी