शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

राममंदिराचे काम लवकर सुरू करा - सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 01:38 IST

पंतप्रधानांंना पत्र : सुप्रीम कोर्टाच्या परवानगीची गरज नाही, सरकारला कोणतीही संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे दुसरे पर्व सुरू होताच श्रीराम मंदिर उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांंना पत्र लिहून मंदिर लवकर उभारण्याचे आवाहन केले आहे. यासाठी केंद्र सरकारला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयही याबाबत प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

सरकारने सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी, हा चुकीचा कायदेशीर सल्ला आहे. नरसिंह राव यांनी त्या जमिनीचे राष्ट्रीयीकारण केले होते. तेव्हा अनुच्छेद ३००-अ तहत सर्वोच्च न्यायालय कोणताही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय केवळ मोबादला ठरवू शकते. तेव्हा मंदिर उभारण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यास सरकारपुढे कोणतीही अडचण नाही, असे स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे.

चार पानी पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राममंदिर उभारण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. सरकारने यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे (६७ एकरांपेक्षा जास्त) वादग्रस्त नसलेली जमीन परत मागितली आहे. सॉलिसिटर जनरल यांची याचिका चुकीची आहे. सरकारला आपल्या ताब्यातील जमीन सर्वोच्च न्यायालयाकडून परत मागण्याची गरज नाही. घटनेतील अनुच्छेद ३००-अ आणि भू-संपादनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व निर्णयांचाही त्यांनी दाखला देत म्हटले आहे की, केंद्र सरकारला सार्वजनिक हितासाठी कोणतीही जमीन वा संपत्ती कब्जात घेण्याचा अधिकार आहे.

तत्कालीन नरसिंह राव सरकारच्या १९९३ च्या निर्णयाचा हवाला देत स्वामी यांनी या पत्रात म्हटले आहे की, सरकारने १९९३ मध्ये वादग्रस्त आणि वादग्रस्त नाही, अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी कब्जात घेतल्या होत्या. १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही कृती वैध ठरविली होती. त्यानंतर रामजन्मभूमी विश्वस्त समितीसोबत सर्व पक्षकारांनी सरकारी मोबदला मान्य केला. कायद्याबाबत मला असलेल्या माहितीनुसार सरकारला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयासह कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. तेव्हा सरकारने वेळ न दवडता अधिकाराचा वापर करून राममंदिरासाठी वादग्रस्त आणि वादग्रस्त नसलेले दोन्ही भूखंड द्यावेत.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीRam Mandirराम मंदिर