शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

जतमध्ये खुल्या डाळिंब सौद्यांना प्रारंभ

By admin | Updated: December 5, 2015 00:41 IST

पतंगराव कदम : दुष्काळी उपाययोजनांकडे राज्य शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

जत : राज्यातील युती शासनाने दुष्काळी जनतेसाठी आजपर्यंत ठोस निर्णय घेऊन काहीच केले नाही. आमच्या कालावधित आघाडी शासनाने घेतलेले निर्णय कायम करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेश काढले आहेत, अशी माहिती माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली. ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौदा प्रारंभप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.जत तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. याची माहिती घेण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर दौरा केला जाणार आहे, असे सांगून डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.जत तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून परिवर्तन झाले आहे. निवडणूक प्रचारात आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सहा महिन्याच्या आतच केली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनशेठ कदम एकत्र बसून बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत आहेत. भविष्यात उमदी (ता. जत) येथे उपबाजार समिती, जत येथे शीतगृह बांधण्यासठी एकमताने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत म्हणून बाजार समितीने गरज असेल तेथे चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, शासनाच्या आदेशाची वाट पाहू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, जत बाजार समिती आता स्वयंपूर्ण झाली आहे. पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा जत येथे उभारण्यात येणार आहे. भविष्यात डाळिंब बियाणे पॅँकिंग करून ते परदेशात विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करून शासन शेती व्यवसाय निर्माण केला जाईल, असे त्यांनी सांगितले. विक्रम सावंत यावेळी म्हणाले की, शेतकरी व व्यापाऱ्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी बाजार समितीने जत तालुक्यात प्रथमच डाळिंब सौदे सुरू केले आहेत. उमदी येथे उपबाजार समिती निर्माण झाल्यास पूर्व भागातील शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे. यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, आकाराम मासाळ, पी. एम. पाटील, नामदेव बजबळकर, रायगोंडा बिराजदार सभापती संतोष पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार उमाजी सनमडीकर, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, मल्लेश कत्ती, पिराप्पा माळी, दिलीप सोलापुरे, नीलेश बामणे, सुजय शिंदे, मीनाक्षी आक्की, नीलाबाई कोळी, श्रीकांत शिंदे, जीवन पाटील, आय. जी. शेख आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)आठवड्यात तीन सौदे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौद्यास शुक्रवारी प्रारंभ झाला. डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.यामुळे डाळिंब विक्रीला प्रतिसाद मिळणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.