शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांना देणार स्टार रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 06:21 IST

जल क्षमतेच्या आधारावर राष्ट्रीय जल अभियानातहत जलशक्ती आणि भारतीय मानक विभागाने मानांकन निश्चित केले आहेत.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशनर यासारख्या विजेवर चालणाºया उपकरणांप्रमाणे आता नळ, शॉवर, फ्लश सिस्टर्नलाही तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहेत. जल क्षमतेच्या आधारावर राष्ट्रीय जल अभियानातहत जलशक्ती आणि भारतीय मानक विभागाने मानांकन निश्चित केले आहेत.भारतीय मानक विभागाने (बीआयएस) पाण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि स्वच्छतेच्या उपकरणांच्या क्षमतेनुसार स्टार रेटिंग देण्यासाठीचा मसुदा तयार केला आहे. क्षमतेबरोबरच पाणी बचत करणारे नळ आणि फ्लशला रेटिंग दिली जाईल. या उपकरणांतून प्रतिमिनिट किती पाणी येते, या आधारे स्टार रेटिंग ठरविली जाईल. वापरानुसार स्वतंत्र रेटिंग दिली जाईल. प्रतिमिनिट १० लिटर पाण्याचा वापर करणाºया शॉवरला एक स्टार, ८ लिटरच्या शॉवरला दोन आणि ६.८ लिटरच्या शॉवरला तीन स्टार दिले जातील. वॉशबेसिनच्या तोटीबाबत प्रतिमिनिट ८ लिटर पाणी प्रवाहित होणाºया तोटीला एक, ६ लिटरसाठी दोन आणि तीन लिटरसाठी तीन स्टार दिले जातील.>आरओ, कूलर वॉशिंग मशीनला रेटिंग...जलशक्ती मंत्रालयाच्या एका अधिकाºयानुसार स्वच्छता (सॅनिटरी) उपकरणांनंतर पाण्यासाठी वापरल्या जाणाºया विजेच्या उपकरणांना रेटिंग लागू केली शकते. यात प्रामुख्याने आरओ, प्युरिफायर असतील. जल संवर्धनावर ज्या प्रकारे भर दिला जात आहे, त्यावरून वीज आणि जल क्षमता मानांकन अनेक उपकरणांसाठी अनिवार्य केले जाऊ शकते.याशिवाय वॉशिंग मशीन, डिश वॉशर, कूलर यासारख्या उपकरणांना पाण्याच्या वापरानुसार रेटिंग दिली जाईल. यामुळे पाण्याची बचत करण्यास चालना मिळेल आणि लोक अशाच उपकरणांची निवड करून पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट पूर्ण शकतील.