ईदच्या मिरवणुकीवर मलकापूरात दगडफेक
By admin | Updated: December 25, 2015 02:58 IST
मलकापूर (बुलडाणा) : ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी मलकापूर येथे घडली. एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याची तक्रार मलकापूरचे माजी नगराध्यक्ष हाजी रशीदखाँ जमादार यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेची माहिती मिळताच, परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने तैनात करण्यात आली. दंगलनियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)