शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

IPS संदीप चौधरींनी मन जिंकलं; 90 वर्षांच्या वृद्ध हॉकरला आपल्या खिशातून दिले 1 लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 14:39 IST

खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.

श्रीनगर - खाकीची भीती नेहमीच लोकांच्या मानात असते. पण, या खाकीमागेही एक माणूसच असतो आणि त्यालाही मन असते. अशाच एका आयपीएस अधिकाऱ्याने माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. श्रीनगरमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात दिला. या वृद्ध हॉकरने आपल्या अंत्यविधीसाठी एक-एक पैसा जोडून ठेवला होता. मात्र, त्यांची ही आयुष्याची कमाई काही चोरट्यांनी लुटून नेली. 

श्रीनगरचे एसएसपी संदीप चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक बचतीतून या 90 वर्षांच्या हॉकरला 1 लाख रुपये दिले आहेत. जुन्या श्रीनगरच्या बोहरी कदल भागात रस्त्याच्या कडेला हरभरे विकणाऱ्या अब्दुल रहमान यांना मदत करण्याच्या एसएसपींच्या या निर्णयाचे लोक प्रचंड कौतुक करत आहेत.

एसएसपी करतायत तपास - काही चोरट्यांनी शिनिवारी अब्दुल रहमान यांना बेदम मारहाण केली आणि त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमवलेले एक लाख रुपये पळवले. यासंदर्भात बोलताना एसएसपी संदीप म्हणाले, पैसा आणि इतर गोष्टींपेक्षाही माणुसकी महत्वाची आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ते स्वतःच या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. यानंतर, संदीप चौधरी यांचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे. यापूर्वीही ते अशाच घटनांमुळे चर्चेत आले आहेत.

उपनिरीक्षक पदासाठी निवड -काही वर्षांपूर्वी त्यांनी गरजू विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी मदत केली होती. त्यांना याचे फळही मिळाले. त्यांच्या प्रयत्नांमुळे 38 विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्य पोलिसांच्या विविध शाखांमध्ये उपनिरीक्षक पदासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJammu Kashmirजम्मू-काश्मीरhawkersफेरीवाले