शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून केले जात आहे श्रीदेवींच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 15:02 IST

प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे.मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे...

 नवी दिल्ली - प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे. हवाहवाई गर्लने जीवनाच्या रंगमंचावरून एकाएकी एक्झिट घेतल्याने तिचे चाहते हळहळत आहेत. मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात येत आहे. त्यानंतर दुबई पोलिसांकडून फॉरेंसिक तपासाचा अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यानंतरच श्रीदेवी यांचे पार्थिव रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पाठवण्यात येईल. भारतात प्रकृती अस्वस्थ्यामुळे मृत्यू झाल्यास सर्वसामान्यपणे  पोस्टमॉर्टेम केले जात नाही. पण दुबईमध्ये वेगळे कायदेकानून आहेत. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक असला तरी तिथे मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. या कारणांमुळे होत आहे श्रीदेवींच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम - श्रीदेवींचा मृत्यू हृदयगती थांबल्याने झाला. पण दुबईमधील कायद्याप्रमाणे कुठल्याही परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा तपास केला जातो. त्यासाठी पोस्टमॉर्टेम केले जाते. जेणेकरून मृत्यूच्या खऱ्या कारणाचा शोध घेता येऊ शकेल. -  तसेच पोलिसांना कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करावे लागतात. त्याअंतर्गत संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते.. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केले जाते.  - पोस्टमॉर्टेमनंतर येणाऱ्या अहवालात मृत्यूचे कारण नमूद केले जाते. तसेच या कागदपत्रांवर पोलिसांची मोहोर लावलेली असते. -  सध्या दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून,  सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर त्यांचा मृतदेह मुंबईत आणता येईल.   

टॅग्स :Srideviश्रीदेवीbollywoodबॉलिवूड