शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:38 IST

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत.

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. जनतेचा रोष इतका वाढला आहे की, त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला आणि पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावली. आर्थिक संकटामुळे गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा असलेला श्रीलंकेचा मित्र भारत आज पुन्हा त्याच्या पाठीशी उभा आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताने आश्वासन दिले आहे. आम्ही यापूर्वीही पाठिंबा दिला होता आणि आजही आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही सर्व शक्य मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि नेहमीच मदत केली आहे. ते त्यांच्या समस्येवर काम करत आहेत, आता पुढे काय होईल ते पाहू, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

कोणत्याही देशाने मदत केली नाहीश्रीलंकेतील भारताच्या उच्चायुक्तांनी एक निवेदन दिले आहे, या विषम परिस्थितीतही भारत आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडेल आणि आज आम्ही श्रीलंकेच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आर्थिक संकट आणि हिंसक निषेध असूनही जगातील कोणत्याही देशाने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला नाही. पण, भारताने आपले मोठे मन दाखवले आहे आणि श्रीलंकेला सर्व प्रकारे मदत करणार, असे त्यांनी सांगितले.

सर्व कॅबिनेटचा राजीनामाशनिवारपासून सुरू असलेल्या निदर्शनांनंतर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. आता विक्रमसिंघे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री एक एक करून राजीनामे देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आपला राजीनामा सादर करतील.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर